Nojoto: Largest Storytelling Platform

भीम बाप झाला, भीम खास झाला.. भीम विश्वास माझा, भीम

भीम बाप झाला,
भीम खास झाला..
भीम विश्वास माझा,
भीम श्वास झाला..
                          वेदनेचे युद्ध झाले,
                          युद्ध हेच दुःख झाले..
                          दुःख बुद्ध झाले,
                          बुद्ध संन्यास झाले..
जगताची माय,
माय ती रमाई..
युगे अठ्ठावीस राहील,
मी तिच्याच रे पायी..
                         शिक्षणाचा वसा,
                         घेतला जयांनी..
                         राष्ट्रहिता जे महान,
                         क्रान्तिज्योतीची पुण्याई..
आरक्षण देवूनी,
केला उद्धार बहुजनांचा..
छत्रपती शाहू महाराज,
सन्मान माणसाचा..
                         स्वच्छतेचे अमृत,
                         पाजीले रे जगाला..
                        कसे  विसरु मी सांगा,
                         संत गाडगेबाबाला.. 
प्रेमाचे ख़रे रूप,
दाविले कबिरांनी..
कृष्ण ही दिवाना,
अन मीराही दीवानी.. 
                         सम्राट अशोक,
                         शौर्याचे प्रतीक..
                         धम्मचक्र फिरविले,
                         किती बघा ते सटीक..
भीमा कोरेगावाची,
कथा ती निराळी..
ग़ुलामीविरुद्ध फोड़ली,
वाघांनी ही डरकाळी..
                         संत तुकडोजी,
                         आणि संत रोहिदास..
                         संत तुकारामांनी दिले
                         थोर साहित्य आम्हांस
शिवशंभुचा तर आहे 
थाट आसमानी..
बाप लेक दोघे वाघ
शत्रु मागे पाणी..
                          जिजाऊच्या आम्ही लेकी,
                          अहिल्येचा मार्ग वाहू..
                          राणी लक्ष्मीबाई आणि
                          झलकारी पुन्हा दाऊ..
माझे गुरु, माझे
आई आणि बाबा..
जन्म दिला आम्हाला,
दिला माणुसकिचा धागा..
                   #shilpasalve #Gurupurnima2020  #Life_experience  #Quarentine_Effect #CoronaLockdown #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
भीम बाप झाला,
भीम खास झाला..
भीम विश्वास माझा,
भीम श्वास झाला..
                          वेदनेचे युद्ध झाले,
                          युद्ध हेच दुःख झाले..
                          दुःख बुद्ध झाले,
                          बुद्ध संन्यास झाले..
जगताची माय,
माय ती रमाई..
युगे अठ्ठावीस राहील,
मी तिच्याच रे पायी..
                         शिक्षणाचा वसा,
                         घेतला जयांनी..
                         राष्ट्रहिता जे महान,
                         क्रान्तिज्योतीची पुण्याई..
आरक्षण देवूनी,
केला उद्धार बहुजनांचा..
छत्रपती शाहू महाराज,
सन्मान माणसाचा..
                         स्वच्छतेचे अमृत,
                         पाजीले रे जगाला..
                        कसे  विसरु मी सांगा,
                         संत गाडगेबाबाला.. 
प्रेमाचे ख़रे रूप,
दाविले कबिरांनी..
कृष्ण ही दिवाना,
अन मीराही दीवानी.. 
                         सम्राट अशोक,
                         शौर्याचे प्रतीक..
                         धम्मचक्र फिरविले,
                         किती बघा ते सटीक..
भीमा कोरेगावाची,
कथा ती निराळी..
ग़ुलामीविरुद्ध फोड़ली,
वाघांनी ही डरकाळी..
                         संत तुकडोजी,
                         आणि संत रोहिदास..
                         संत तुकारामांनी दिले
                         थोर साहित्य आम्हांस
शिवशंभुचा तर आहे 
थाट आसमानी..
बाप लेक दोघे वाघ
शत्रु मागे पाणी..
                          जिजाऊच्या आम्ही लेकी,
                          अहिल्येचा मार्ग वाहू..
                          राणी लक्ष्मीबाई आणि
                          झलकारी पुन्हा दाऊ..
माझे गुरु, माझे
आई आणि बाबा..
जन्म दिला आम्हाला,
दिला माणुसकिचा धागा..
                   #shilpasalve #Gurupurnima2020  #Life_experience  #Quarentine_Effect #CoronaLockdown #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358