Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry धुके शुभ्र धुके ते दिसे सभोवती अंधुक

#OpenPoetry धुके

शुभ्र धुके ते दिसे सभोवती 
अंधुक दिसती झाडे
अंधुक रस्ते अंधूक गाड्या
 अंधूक दिसती वाडे
दूरदूरचे दिसे न काही 
गाड्याही धावती संथगती
लाईटी लावूनी झाली तरी 
चालकांची ती कुंठीत मती
कान बांधूनी स्वेटर घालुनी
 हात खिशात बंद केले
चौकाचौकात करूनी शेकोट्या
 शेकत हो कुणी बसले
हात गारठले कान गारठले 
थडथडती दात
सर्वाच्या मुखातून पाहिली
 वाफ ती जात
चहा काॅफीचे कप रिचवले
 आज पहाटेला
हिवाळ्याने धुक्याचा हा
 चमत्कार केला
अंग हालती शब्द न बोलती 
 अशी धुक्याची करणी
हिवजादूगारे रूप घेतले
 आज जणू अवनी
हरितवनांवर दवबिंदूंचा 
पडू लागला सडा
शुभ्रनभातून शुभ्रधुक्याचा 
पाऊस आला बडा
सगळे फिरती रस्त्यावरती 
तरी न कुणी भिजती
हातकान ते सुंभ होऊनी 
नाकास येते भरती
सूर्य उगवता पूर्वेला
 प्रकाश तेजस्वी आला
जादूगारे पाहूनी धुक्याचा 
खेळच संपवला धुके
#OpenPoetry धुके

शुभ्र धुके ते दिसे सभोवती 
अंधुक दिसती झाडे
अंधुक रस्ते अंधूक गाड्या
 अंधूक दिसती वाडे
दूरदूरचे दिसे न काही 
गाड्याही धावती संथगती
लाईटी लावूनी झाली तरी 
चालकांची ती कुंठीत मती
कान बांधूनी स्वेटर घालुनी
 हात खिशात बंद केले
चौकाचौकात करूनी शेकोट्या
 शेकत हो कुणी बसले
हात गारठले कान गारठले 
थडथडती दात
सर्वाच्या मुखातून पाहिली
 वाफ ती जात
चहा काॅफीचे कप रिचवले
 आज पहाटेला
हिवाळ्याने धुक्याचा हा
 चमत्कार केला
अंग हालती शब्द न बोलती 
 अशी धुक्याची करणी
हिवजादूगारे रूप घेतले
 आज जणू अवनी
हरितवनांवर दवबिंदूंचा 
पडू लागला सडा
शुभ्रनभातून शुभ्रधुक्याचा 
पाऊस आला बडा
सगळे फिरती रस्त्यावरती 
तरी न कुणी भिजती
हातकान ते सुंभ होऊनी 
नाकास येते भरती
सूर्य उगवता पूर्वेला
 प्रकाश तेजस्वी आला
जादूगारे पाहूनी धुक्याचा 
खेळच संपवला धुके

धुके #poem #OpenPoetry