Nojoto: Largest Storytelling Platform

White ह्यो आमचा तो तुमचा पुरे झालं आता.. आपुलकीच्

White ह्यो आमचा तो तुमचा 
पुरे झालं आता..
आपुलकीच्या नात्यांच्या 
करूया आपण बाता..

हा झेंडा तो झेंडा 
ठेवून द्या सगळं..
जगण्यातल जग
खूप आहे वेगळं..

गावातलं राजकारण 
किती जरी तापलं..
कार्यकर्ता म्हणून 
कोणी मन जपलं?

मैत्रीच्या नात्याला 
पुन्हा मैत्रीत जुळवूया..
आधीसारखं गाव
पुन्हा नव्याने फुलवूया..

©गोरक्ष अशोक उंबरकर #election2024
White ह्यो आमचा तो तुमचा 
पुरे झालं आता..
आपुलकीच्या नात्यांच्या 
करूया आपण बाता..

हा झेंडा तो झेंडा 
ठेवून द्या सगळं..
जगण्यातल जग
खूप आहे वेगळं..

गावातलं राजकारण 
किती जरी तापलं..
कार्यकर्ता म्हणून 
कोणी मन जपलं?

मैत्रीच्या नात्याला 
पुन्हा मैत्रीत जुळवूया..
आधीसारखं गाव
पुन्हा नव्याने फुलवूया..

©गोरक्ष अशोक उंबरकर #election2024