Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser2767779309
  • 139Stories
  • 44Followers
  • 1.7KLove
    6.5KViews

गोरक्ष अशोक उंबरकर

  • Popular
  • Latest
  • Video
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

माहेराला आल्यावर 
जुने अल्बम बघत बसते..
वेडी कुठली, ड्रेस घालून 
ती बालपण जगत असते..

घराजवळच्या काकुंना 
ती अचानक समोर दिसते..
घरी ये ग चहाला 
असं हळुच काकू म्हणते..

बालपणीच्या मैत्रिणींची 
ती गोष्ट आठवत राहते..
सगळ्याजणी मोठेपणी 
सासरी निघुन जाते..

जन्मदात्या तिच्याच गावी
ती पाहुनी बनून जाते..
सांगा बरं माहेरची 
आठवण कुणाकुणाला येते..

आठवण कुणाकुणाला येते..

©गोरक्ष अशोक उंबरकर #library
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

किन्नर..
दो पैर दो हाथ के 
हम भी नर या नारी है..
चेहरा मर्द सां होकर भी 
फीर भी पेहने सारी है ..

रोड हायवे सिग्नल पर 
बार बार बजती ताली है..
हिजडा हिजडा बोलते हमे 
क्या सच मे हम गाली है..

ना कोई वजुद हमारा 
जैसे कीचड की नाली है..
पेट के चक्कर से हमारे 
ओठो पर आज लाली है..

घर- माँ बाप होते हुये 
फिर भी ना कोई घर हैं..
सिर्फ यही गलती है हमारी 
  हम ना तो नारी या नर है..

हम ना तो नारी या नर है..

©गोरक्ष अशोक उंबरकर #sad_quotes
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

तृतीपंथी...
दो पैर दो हाथ की
हम भी नर या नारी है..
चेहरा मर्द सां होकर भी 
फीर भी पेहने सारी है ..

रोड हायवे सिग्नल पर 
बार बार बजती ताली है..
हिजडा हिजडा बोलते हमे 
क्या सच मे हम गाली है..

ना कोई वजुद हमारा 
जैसे कीचड की नाली है..
पेट के चक्कर से हमारे 
ओठो पर आज लाली है..

माँ बाप होते हुये हमे 
फिर भी ना कोई घर हैं..
सिर्फ यही गलती हमारी 
 हम ना कोई नारी या नर है..

हम ना कोई नारी या नर है..

©गोरक्ष अशोक उंबरकर
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

प्रेम अन् मैत्री पेक्षा 
काहीतरी वेगळं आहे..
तुझ्या माझ्या नात्यात 
खरंतर सगळं सगळं आहे..

मिञ, तत्त्वज्ञ, वाटाड्या 
मी तुझ्यात सारं शोधतो...
शोधताना माझे मला
एक वेगळा आनंद भेटतो..

तुझ्यासोबत चालताना 
मी भाग्य माझे मानतो..
अनमोल अश्या प्रेमाला 
नक्कीच मी जाणतो..

©गोरक्ष अशोक उंबरकर #sad_quotes
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

न बोललेल्या शब्दांना 
लिहायला छान जमतं..
 लिहिताना ही मन माझं 
तितकच तुझ्यात रमतं..

तुझ्यावर लिहिताना 
मनातलं तुझ्या कळतं..
तुझ्यात मला रमताना 
वेगळं सुख मिळतं..

पानावरती लिहितांना  
शब्दांच छान जुळतं..
तुझ्यासमोर बोलताना 
सारं गणित माझं अडखळतं ..

सारं गणित माझं अडखळतं..

©गोरक्ष अशोक उंबरकर #sad_quotes
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

कुठली भाजी करायची रोज
तुझ तूच ठरवून घे..
सांज सकाळ विचारण्याची
सवय आता बदलून घे..

शॉपिंग शॉपिंग म्हणते नेहमी
माहेरी जाऊन करून घे😂..
आठ दिवस गावी जाऊन
तिकडेच माहेरी फिरून ये..

 एकदाच काय सांगायचं ते 
तासाभरात बोलून घे..
उरलेल्या 23 तासात मला
शांतपणे जगू दे..

आहे तो पर्यंत तरी मला
मोकळा श्वास घेऊ दे..
श्र्वासासोबत किरकिरी ची  
किमान सवय तरी होऊ दे ..

©गोरक्ष अशोक उंबरकर happy birthday बायको

happy birthday बायको #मराठीकविता

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

ना त्याने विचारल 
ना तिने कधी सांगितल 
पण दोघांना माहित होत
दोघांच्या मनातलं..

तुला बघताना प्रेमाची 
लहर जागी झाली..
न राहून ही मनाला 
खूप भावून गेली ..

स्टँड वरल्या भेटीने 
मनात घर करून गेली...
गोऱ्या गोऱ्या पाठीला
माझी नजर शोधून आली ..

सौंदर्याच्या शर्यतीत 
 मला हरवून गेली..
हरवलेल्या मनाला
मनातच भरून गेली..

©गोरक्ष अशोक उंबरकर #sad_quotes love
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

सत्ता असली जरी कुणाची 
 आमच्या मताला किंमत द्या..
शेतात राबणाऱ्या गड्याला 
नवी जगण्याची हिम्मत द्या..

वीज रस्ते पाण्यासोबत 
मुलीबाळीना संरक्षण द्या..
आर्थिक निकष लावून साऱ्या 
गरीबीलां आरक्षण द्या..

कर्ज घेऊन शिकतो आम्ही 
तुम्ही फक्तं रोजगार द्या..
इतकं सगळं जमणार तरच 
सत्ता तुमच्या हातात घ्या..

सत्ता तुमच्या हातात घ्या..

©गोरक्ष अशोक उंबरकर satta
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

White जगण्यातलं पहिलं प्रेम
 जेव्हा नव्याने पाहतो..
पाहताना सगळे क्षण 
माझं मलाच वाहतो..

आठवणींतल प्रेम मी
थोडं वाटत जातो..
समाधानाच्या पायरीवर 
मी थांबून राहतो..

भावनांना जेव्हा 
शाईच्या शब्दात लिहितो..
लिहिताना कधी 
ओठाने बोलून पाहतो..

जरा वेळेचा सुसंवाद 
खूप काही देऊन जातो..
का कुणास ठाऊक 
मन जरासे भेदून पहातो 
..

©गोरक्ष अशोक उंबरकर #sad_quotes
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

White ह्यो आमचा तो तुमचा 
पुरे झालं आता..
आपुलकीच्या नात्यांच्या 
करूया आपण बाता..

हा झेंडा तो झेंडा 
ठेवून द्या सगळं..
जगण्यातल जग
खूप आहे वेगळं..

गावातलं राजकारण 
किती जरी तापलं..
कार्यकर्ता म्हणून 
कोणी मन जपलं?

मैत्रीच्या नात्याला 
पुन्हा मैत्रीत जुळवूया..
आधीसारखं गाव
पुन्हा नव्याने फुलवूया..

©गोरक्ष अशोक उंबरकर #election2024
loader
Home
Explore
Events
Notification
Profile