संसार... संसार असतो सुखदुःखाची जोडी दोन जीवास जगण

संसार...
संसार असतो सुखदुःखाची जोडी 
दोन जीवास जगण्यासाठी लावतो तो गोडी 
साथीदार देतात एकमेकास सोबत 
थोडासा खट्याळपणा तर कधी थोडी असते गंमत 
जन्मोजन्मीसाठी वेगळाच हा प्रवास 
आयुष्यात बनतो खास क्षणांचा सहवास
कधी होतात मतभेदावरूनी वादविवाद 
शेवटी तर्क लावूनी एकमेकांशी साधतात संवाद 
अनुभव फार आणि वेगळ्या अशा भावना 
गुंतल्या जातात निराळ्याच सहसंवेदना
संसारातल्या अट्टाहासाचे ते भांडण 
जबाबदारीच्या जाणिवेचे डोळ्यात घालते अंजण
दोघांपैकी एक कोणीतरी त्यात चुकायचे 
चुकीतूनच नवीन वेगळं काहीतरी शिकून घ्यायचे 
संसार संसार जीवाला लागला वेगळा घोर 
नाही संपत कितीही केला तरी तो हलका भार.

©Mayuri Bhosale #संसार
संसार...
संसार असतो सुखदुःखाची जोडी 
दोन जीवास जगण्यासाठी लावतो तो गोडी 
साथीदार देतात एकमेकास सोबत 
थोडासा खट्याळपणा तर कधी थोडी असते गंमत 
जन्मोजन्मीसाठी वेगळाच हा प्रवास 
आयुष्यात बनतो खास क्षणांचा सहवास
कधी होतात मतभेदावरूनी वादविवाद 
शेवटी तर्क लावूनी एकमेकांशी साधतात संवाद 
अनुभव फार आणि वेगळ्या अशा भावना 
गुंतल्या जातात निराळ्याच सहसंवेदना
संसारातल्या अट्टाहासाचे ते भांडण 
जबाबदारीच्या जाणिवेचे डोळ्यात घालते अंजण
दोघांपैकी एक कोणीतरी त्यात चुकायचे 
चुकीतूनच नवीन वेगळं काहीतरी शिकून घ्यायचे 
संसार संसार जीवाला लागला वेगळा घोर 
नाही संपत कितीही केला तरी तो हलका भार.

©Mayuri Bhosale #संसार