Nojoto: Largest Storytelling Platform
mayuribhosale6110
  • 47Stories
  • 17Followers
  • 563Love
    0Views

Mayuri Bhosale

  • Popular
  • Latest
  • Video
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

जिंदगी....
जिंदगी मे आती है बहुत सारी समस्या 
हम भी हारेंगे नही करेंगे परिश्रम की कठोर तपस्या
मन तो करता है जिंदगी अपने हिसाब से चले 
लेकिन किसे पता की क्या है पडा किसके गले 
इम्ताह तो लेती है जिंदगी खूप जादा 
डटकर सामना करेंगे ये है हमारा वादा 
पहाडो की चट्टानो जैसी है जिंदगी हमारी 
छू लेंगे हम बनकर वादियों की सवारी

©Mayuri Bhosale जिंदगी

जिंदगी #कविता

3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

🤪🤪 नवऱ्याचे बोलणे कसे बायकोला खुपले....(विनोदी संवाद)🤷😏🫣🤪
नवरा आजकाल मला बोलतो कसा 
काही नवीन रेसिपी करू नका शांत जरा बसा 
रोज नवीन डिश खाऊन खाऊन 
कंटाळा आलाय मला हे सगळं तुझं तेच ते पाहून 
नवीन रेसिपी करून झाली आहेस खुळी 
देशील बाई माझा कुठेतरी आता बळी 
पहिलीच होतीस तशी राहा बरी
नाहीतर लोक येऊन विचारतील आहे का ती वेडी घरी 
तुझ्या रेसिपी तर नाहीत काही खास 
लावू नकोस जीवघेणा फुकटचा गळ्याला फास 
रोजच खाऊन नवीन रेसिपी झालेत वांदे
रिकाम्या टेकड्या माणसांचे असलेच उद्योगधंदे
बघा काही जमतय का नोकरीचे 
असले नाद सोडून प्रयत्न करा पोटाच्या भाकरीचे

©Mayuri Bhosale विनोदी संवाद

विनोदी संवाद #मराठीकविता

3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

सपान...
मला पण रोज पडतं बघा एक सपान 
फिरत राहत मन सारं देश त्यात गप्प गुमान
नाय कसली धावपळ नाय कसली घाय
डोळा उघडताच पोरं म्हणत्यात अग उठना मांय 
मला पण वाटतं उंच उंच उडावं 
मायेच्या ओढीनं लागत मग सारं सोडावं 
किती बाय घालमेल ती माझ्या या मनाची 
जाण व्हते मग चुलीवरल्या त्या भाकरीच्या तव्याची 
लगीन नव्हतं मला पण लवकर करायचं 
माझा बाप म्हणालो तुला नाही आता ते कोडं उमगायच
कोणाला तर कुठे माहित मला काय वाटतं
रीत जगाची न्यारी आतला हृदयाचा कोपरा ताडकन तुटतं 
नाही राहिलं आता बाय मागचं ते दिवस 
आकाशात जाऊन  बायका पण पाडालेत सपनांचा पाऊस
असं म्हणत्यात सपान बघावं तर पहाटेच
खरंच जगात बायांनी करून दाखवलं चीज कष्टांच 
सारं काय करायचं या आपल्या घरादारासाठी 
नको बाय उतार वयात दुःख कुठलं वाटी 
जगावं वाटतं सारं सोडून कधी कधी सपनातील दुनियेत 
चिंब भिजलेले मन गुंफत पुन्हा मायेच्या जाळेत
मनी करत राहील सदा या सपनातल्या सपनाचा पाठलाग 
धावीन आता बाय  पाहता न भूतकाळ कसला मांग
जगाण पण जानाव परतेक जीवाचं असतं एक सपान
बघायला मिळंल आशेची पंखात दडलेली वेगळीच उडान

©Mayuri Bhosale सपान
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

White आयुष्य...
आयुष्य चालले सारे निसटूनी
रिकामा खिसा भरण्यासाठी 
रात्र दिवस ही समजेना 
वेळ राहिला फक्त धावण्यासाठी 
गुंफूनी घेतले आयुष्य 
सुखात जीवन घालवण्यासाठी 
हरवून बसलो आहोत नाती 
चार मोहाच्या क्षणांसाठी 
 हसणे सुद्धा विसरले 
किंमत होऊनी गेली त्याची शून्य लोकांसाठी 
नात्यागोत्याची तर परवाच नाही 
जोडली फक्त मुळी त्या स्वार्थासाठी 
सामावले जवळच आयुष्याचे गुपित 
निकट असले तरी गप्प राहण्यासाठी 
कुणालाच इथे कुणाची पडली नाही 
स्पर्धा सुरू झाली फक्त जिंकण्यासाठी 
जो तो धावत आहे सुखासाठी 
सारीपाटाचा डाव सारा मांडला 
कोडेच पडले एक जगण्यासाठी......

©Mayuri Bhosale आयुष्य
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

White रिमझिम पाऊस....

ढग आले दाटूनी आकाशी 
सुरू झाली त्यांची इकडे तिकडे धावपळ

                रिमझिम धो धो बरसला पाऊस 
                मोत्यांच्या गारांनी भरली ओंजळ 

विजांच्या कडकडाटानी नभी 
चमकुनी मांडला खेळ 

                सांज अंबरी दाटली 
                प्रकाशाची लखलखीत वेळ

मनावर उमटली काहीसी 
अंधाराची छटा निराळी 

                 ओढ लागली घरट्याची 
                  साद घाली पक्षी त्या कातरवेळी 

गवताची सुरू झाली 
जमिनीवरती चुळबूळ 

                    मातीच्या त्या गंधाची
                    मनमोहक अलगशी दरवळ

टप टप पावसाचा आला
गालावरती एक ओघळ

                     सरसर निसटूनी गेला खाली
                     ओल्या आसवांबरोबर घरंगळ 

लोकांची केली या पावसाने 
नुसती घाईघाईची पळापळ

                      रस्त्यावरती वाहनांची जमा झाली 
                      एकमेकास रेटूनी भली मोठी वर्दळ

©Mayuri Bhosale #रिमझिम पाऊस
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

White घराघरातील  वाद विवाद....( बायको vs नवरा )

बायको:   मी म्हणून राहिले 
 नवरा:    तसे गाली मिश्किल पणे हळूच हसले 
बायको:   मी म्हणूनच फसले 
 नवरा:    मी होतो म्हणून सारे काही सोसले
बायको:   कुठून लग्नाची बुद्धी सुचली
नवरा:    चुकून तू माझ्या गळ्यात पडली 
बायको:   व्यथा ही माझी कशी कुठे मांडू 
नवरा:    कशाला उगीचच आपण आता भांडू

©Mayuri Bhosale #वादविवाद
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

White आयुष्याला दिले आव्हान...
संकटांनी कितीही छळले तरीही 
घट्ट पकडलेली मातीतील माझी पावले मागे हटणार नाही 
आयुष्यात येथील अनेक प्रसंग 
उरी सळसळलेली लढण्याची उमेद परत फिरणार नाही 
शरीरावरती पडू देत कितीही घाव 
जीवनाची नाव किनारीकाठी पोहोचवायची थांबणार नाही
वाटेत आले आडवे काटे कुठे जरी 
जखमी पावलांना वाकून खाली बघणार नाही 
निवडलेला मार्ग असू देत कितीही वळणावळणाचा 
एकदा धरलेला प्रयत्नांचा रस्ता पुन्हा सोडणार नाही 
वादळं  तुफान कसलेही समुद्री उसळू देत
हाताश होवूनी कधी बसणार नाही
वेदना होतील असंख्य मनावर अश्रू मुळीच गाळणार नाही 
या प्रसंगांनो या उभा मी इथे आहे 
कधीच तुम्हाला घाबरत नाही 
आव्हान हे माझे आयुष्याला 
धाडसाची तलवार जवळ बाळगीन 
रणांगणाची युद्धभूमी पार केल्याशिवाय मागे येणार नाही

©Mayuri Bhosale #आव्हान
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

संसार...
संसार असतो सुखदुःखाची जोडी 
दोन जीवास जगण्यासाठी लावतो तो गोडी 
साथीदार देतात एकमेकास सोबत 
थोडासा खट्याळपणा तर कधी थोडी असते गंमत 
जन्मोजन्मीसाठी वेगळाच हा प्रवास 
आयुष्यात बनतो खास क्षणांचा सहवास
कधी होतात मतभेदावरूनी वादविवाद 
शेवटी तर्क लावूनी एकमेकांशी साधतात संवाद 
अनुभव फार आणि वेगळ्या अशा भावना 
गुंतल्या जातात निराळ्याच सहसंवेदना
संसारातल्या अट्टाहासाचे ते भांडण 
जबाबदारीच्या जाणिवेचे डोळ्यात घालते अंजण
दोघांपैकी एक कोणीतरी त्यात चुकायचे 
चुकीतूनच नवीन वेगळं काहीतरी शिकून घ्यायचे 
संसार संसार जीवाला लागला वेगळा घोर 
नाही संपत कितीही केला तरी तो हलका भार.

©Mayuri Bhosale #संसार
3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

कुणीतरी आपल्यासाठी असावे ....
प्रत्येकाला वाटते कुणीतरी आपल्यासाठी असावे 
मनातले बोल सांगायला तिथे जाऊन बसावे 
नाही पटले तरी गाल फुगवून रुसावे 
हळूच डोळ्यातील पाणी ओघळलेले गालावरचे पुसावे 
शहाणपणाचे दोन शब्द सांगून नकळत गोड हसावे
कामाचे कौतुक काव्य बोल मधुर शब्दांनी करावे 
उशीर झाला तरी नजर लावून वाटेकडे दूरवर पहावे
असंच वाटतं  राहत प्रत्येकाला मनापासून
आयुष्यात आपल्यासाठी कुणीतरी असावे.....

©Mayuri Bhosale कुणीतरी आपल्यासाठी असावे

कुणीतरी आपल्यासाठी असावे #मराठीकविता

3982f70dfd19e1e2bdc17bc4e7351776

Mayuri Bhosale

White आभाळी निशा फुलतोरणांची माळली 
शुभ्र चांदण्यांची मैफिल सारी तिथे जमली 
नभी दाटला सोहळा काही निराळा 
नयनी साचला गोडवा उत्सवाचा वेगळा 
अंबरी आला आला रे चंद्र पाहुणा 
डोळ्यात साठवले त्याचे  ते रूप मन आता कुठेच जाईना

©Mayuri Bhosale #चारोळी छोटी कविता मराठी

#चारोळी छोटी कविता मराठी #मराठीकविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile