Nojoto: Largest Storytelling Platform

#स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत... "सकाळी सकाळी काय

 #स्त्रीजन्मालाच_हे_जमू_शकत...
   
"सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं काही कळतच नाही...कधी हसता.. कधी रडता..अचानकच काय होत तुला अस उदास बसायला..काय कमी आहे का तुला घरात? सगळं मागेल ते एका शब्दावर मिळत तरी डोळ्यात आसवं आणायची भारी हौस तुम्हा बायकांना. एवढं चांगलं सासर मिळालं,सासू सासरे अगदी फुलासारख जपतात...मागे सर पण म्हणत नाहीत. नवरा तर जोरू का गुलामच झालाय की तरीही तुम्हाला काय खुपत ते कळायला मार्ग नाही. जाऊदे मला ऑफिसला उशीर होतोय...मी निघतो. संध्याकाळी मला तुझं हे पडकं तोंड बघायचं नाही तेव्हा हसत स्वागत कर आल्यावर."
     नाही वाटत कधी कधी कोणाशी बोलावसं..वाटत शांतच राहावं. काही कमी असते म्हणूनच माणूस असा उदास असतो का?? आठवणींवर कोणाचा ताबा असतो...आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस...मागच्या वर्षी मी तिथे होते तर किती आनंदाने साजरा केला होता. बहीण,भाऊ सगळंच कुटुंब एकत्र येऊन छोटासा कार्यक्रम केला होता. सकाळपासून त्याच आठवणी दाटून आल्यात...नाही मन लागत कामात म्हणून बसले शांत तर त्यावर किती काय बोलून गेला सुमित..इतकं सोप्प आहे का जन्मदाती माणस कायमचं सोडून  नवीन घरात राहणं..राहिलो तरी या आठवणींना तिलांजली देणं तरी इतकं सोप्प आहे का?? पण ज्यांना स्वतःचाच घर, आई वडील,बहीण भाऊ,जिव्हाळ्याची माणसं कधीच सोडून जावं लागतं नाही त्यांना बायकांचं दुःख काय कळणार..माहेर म्हणजे काय कुठे कळणार. जाऊदे किती काही झालं तरी घरातल्या बाईला हसरा चेहरा ठेवूनच रहावं लागतं... तरच ती सुखी अस समजलं जातं. अशा आठवणींना, कधी बरसून येणाऱ्या भावनांना हसण्याआड बांध घालावाच लागतो अस आई म्हणायची ते अगदी खरं...आता पटतंय.
      "कशा आहात मॅडम...हसतेस म्हणजे मूड बरा झाला वाटत. खर आहे हा बायकांचं मन काही केल्या समजणं महाकठीण." 
      "काही नाही झालेलं मला..जरा घरची आठवण आलेली म्हणून"
    "तुला तर सासुरवास नावाचा प्रकारच नाही...तसूभरही त्रास नाही😀. अगदी आनंदात नांदतेस की तरी माहेरची आठवण येते.."
     "जाऊदे ना तुम्हा पुरुषांना ते दुःख नाही कळणार... आठवण यायला सासुरवासच होणं गरजेचा नसतो. बर रविवारी आई बाबांकडे ताई,दादा बाकीचे सगळेच येणार आहेत..आपल्यालाही बोलावलंय"

sandyjournalist7382

sandy

New Creator