Nojoto: Largest Storytelling Platform

उठी उठी सख्या श्रीहरी, सरली आता तम राती, दर्शन देऊ

उठी उठी सख्या श्रीहरी,
सरली आता तम राती,
दर्शन देऊनी तृप्त करी,
भक्तमंडळी वाट पाहती।

मुख प्रक्षाळुनी शुद्ध व्हावे,
झडून जाईल सारी घाण,
शुद्ध पावन होईल सर्वांग,
डोळा दिसता घनश्याम।

पंचामृत, शुद्धोदक आणुनी,
सिद्ध केले सखया स्नानासाठी,
पितांबर नेसवू, गळा घालू माळा,
भाळी गंध, मयूर पिच्छ मुकुटी।

सजला माझा श्यामसुंदर,
नित्य ध्यायीन त्यास मनी,
हृदयी पूजिन त्यास सदा,
म्हणे गणू, रत श्रीकृष्ण चरणी।
🙏🏻🙏🏻🙏🏻 #भूपाळी #मराठी #कान्हा #कृष्ण #yq_gns
उठी उठी सख्या श्रीहरी,
सरली आता तम राती,
दर्शन देऊनी तृप्त करी,
भक्तमंडळी वाट पाहती।

मुख प्रक्षाळुनी शुद्ध व्हावे,
झडून जाईल सारी घाण,
शुद्ध पावन होईल सर्वांग,
डोळा दिसता घनश्याम।

पंचामृत, शुद्धोदक आणुनी,
सिद्ध केले सखया स्नानासाठी,
पितांबर नेसवू, गळा घालू माळा,
भाळी गंध, मयूर पिच्छ मुकुटी।

सजला माझा श्यामसुंदर,
नित्य ध्यायीन त्यास मनी,
हृदयी पूजिन त्यास सदा,
म्हणे गणू, रत श्रीकृष्ण चरणी।
🙏🏻🙏🏻🙏🏻 #भूपाळी #मराठी #कान्हा #कृष्ण #yq_gns