Nojoto: Largest Storytelling Platform

Depression म्हणजेच निराशा, पण, निराशा म्हणजे नक्की

Depression म्हणजेच निराशा,
पण, निराशा म्हणजे नक्की काय? शाळेत असताना शब्दाची फोड करा शिकवलं जायचं तेव्हापासूनच या शब्दांचे अर्थ समजू लागले. निराशा म्हणजेच निरर्थक आशा. म्हणजे आपण आस तर लावतो पण, मनापासून नाही. म्हणजेच एखादी गोष्ट व्हावी असं वाटतं पण मनापासून नाही. आणि जे काम आपण मनापासून नाही करणार ते यशस्वी तरी कसे होणार? ते काम यशस्वी झाले नाही की मग आपण निराश होतो. 
आपण सर्वचजण काहींना काहीतरी काम करत असतो. कोणी गरज म्हणून तर कोणी आवड म्हणून. जे गरज म्हणून काम करतात त्यांनाच बहुतेक वेळा निराश हताश झाल्यासारखं वाटतं. ते काम उत्तम पद्धतीने करतात पण त्यातून समाधान नाही मिळत. आणि असमाधानी माणूस हा फक्त निराश हताश होऊ शकतो. सुरवातीला त्याचा फारसा त्रास नाही जाणवत पण जेव्हा आपण इतरांना आनंदी बघतो तेव्हा मात्र मत्सरापोटी हे नैराश्य अजून वाढतं. बराच काळ लोटून गेल्यानंतर आपण इतके निराश होतो की आता आर या पार. एकतर स्वत:ला संपवतो किंवा ज्यात आपलं मन रमेल असं एखादं काम शोधून ते करतो. 
सगळ्यांनाच यातून मार्ग काढायला नाही जमत. आणि जरी मार्ग काढून बाहेर पडलात तर तो शेवटचा असतो. कारण नंतर परत इतर कोणत्याही कारणामुळे जर परत नैराश्य आलं तर मात्र देवाच्या हाती. 
पण, असं कां होतं?
कारण एकच. जर आपल्याला सुरूवातीपासूनच संकटांना सामोरे जाण्याची सवय नसेल तर नैराश्य हे आपल्या आयुष्यात लिहून ठेवले आहे. पण जर आपल्याला संकटांना सामोरे जाण्याची सवय असेल तर नैराश्य काय असतं हे समजणार सुध्दा नाही. 
पण मग नैराश्य आल्यावर माणूस जीव देण्याचा विचार कां करतो?
स्वाभाविक आहे. नैराश्य म्हणजे संपूर्णपणे नकारात्मकता आणि जेव्हा संपूर्ण नकारात्मकता जवळ येते तेव्हा मनात फक्त वाईट विचार येतात आणि वाईट विचार हे कधीच चांगला मार्ग दाखवत नाही फक्त वाईट मार्गच दाखवतात. त्या क्षणी आपण संकटांपासून दुर पळण्याचा मार्ग शोधत असतो आणि जीव देणे हा सगळ्यात सोप्पा आणि जवळचा मार्ग वाटतो. 
अशा क्षणी काय करावं? 
आपले जे कोणी निकटवर्तीय असतील त्यांच्या सोबत रहावं. असे निकटवर्तीय फक्त आपल्या भल्याचा विचार करतील. आपला गैर फायदा नाही घेणार. आणि असे आपले निकटवर्तीय फक्त दोनच. एक आपले आई-वडील आणि दुसरें आपले जोडीदार नवरा-बायको. 
पण मग असं कां?
कारण, जर चुकून आपण काही वेडावाकडा विचार करून चुकीचं पाऊल उचललं तर फक्त तेच आपल्याला रोखू शकतात. कारण ते स्वत: पेक्षा जास्त आपला विचार करत असतात. 
LockDown मध्ये बरेच जण आयुष्य संपवत आहेत. तुमची निराशा इथे व्यक्त करा. बोलल्याने मन हलकं होतं आणि मार्ग निघण्याचा मार्ग खुला होतो. 

🍁मन एक लेखणी...

©Sandy Beher ✍️ सँडीच्या लेखणीतून...वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट...

sandyjournalist7382

sandy

New Creator

✍️ सँडीच्या लेखणीतून...वाचा मनाला स्पर्श करून जाणारया पोस्ट... #मराठीविचार