Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा अलवार स्पर्श प्रीत मनी फुलवून गेला डोळ्यात द

तुझा अलवार स्पर्श
प्रीत मनी फुलवून गेला 
डोळ्यात दाटल्या भावना
श्वासात सामावून गेला

तुझा अलवार स्पर्श
अंग अंग मोहरून गेला
शब्द तुझ्या नावाचे
  ओठांवर भिजवून गेला

तुझा अलवार स्पर्श
  स्वप्नमनी दाखवून गेला
त्यात मज गुंफून
 छान सजवून गेला

तुझा अलवार स्पर्श
  दुख सारे विरवून गेला
प्रेमरंगात तुझ्या ...सख्या
  मला सुखावून गेला

तुझा अलवार स्पर्श
   पावसासम बरसून गेला
चिंब होऊनी तन-मन
  तुझ्यातच सामावून गेला

     अंजु...!!

©Sujata Chavan #तुझा स्पर्श#
तुझा अलवार स्पर्श
प्रीत मनी फुलवून गेला 
डोळ्यात दाटल्या भावना
श्वासात सामावून गेला

तुझा अलवार स्पर्श
अंग अंग मोहरून गेला
शब्द तुझ्या नावाचे
  ओठांवर भिजवून गेला

तुझा अलवार स्पर्श
  स्वप्नमनी दाखवून गेला
त्यात मज गुंफून
 छान सजवून गेला

तुझा अलवार स्पर्श
  दुख सारे विरवून गेला
प्रेमरंगात तुझ्या ...सख्या
  मला सुखावून गेला

तुझा अलवार स्पर्श
   पावसासम बरसून गेला
चिंब होऊनी तन-मन
  तुझ्यातच सामावून गेला

     अंजु...!!

©Sujata Chavan #तुझा स्पर्श#