Nojoto: Largest Storytelling Platform

*विषय:-शुभमंगल* ********************** शुभमंगल म्ह

*विषय:-शुभमंगल*
**********************
शुभमंगल म्हणता
पडे अक्षदा *डोई,*
सारेच सज्ज झाले
पाहण्याची करी *घाई.*

तुझी न माझी जोडी
स्वर्गात बांधली *ब्रम्हगाठ,*
या मंगलसमयी सख्या
आपुली ही *रेशीमगाठ.*

पाहून प्रिया तुला मी
सांग मना का *बावरले?*
जन्मोजन्मी मी तुझीच
स्वप्न सत्यात *उतरले.*

साज शृंगार करोनी
आज मी *सजले,*
हातात हात घालुनी
सप्तपदी मी *चालले.*

मांगल्याचे प्रतिक घेऊन
सासुरवाशीण *होते,*
प्रेमाच्या या आठवणीत 
मन माहेरीच *फिरते.*
-----------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke नववधू
*विषय:-शुभमंगल*
**********************
शुभमंगल म्हणता
पडे अक्षदा *डोई,*
सारेच सज्ज झाले
पाहण्याची करी *घाई.*

तुझी न माझी जोडी
स्वर्गात बांधली *ब्रम्हगाठ,*
या मंगलसमयी सख्या
आपुली ही *रेशीमगाठ.*

पाहून प्रिया तुला मी
सांग मना का *बावरले?*
जन्मोजन्मी मी तुझीच
स्वप्न सत्यात *उतरले.*

साज शृंगार करोनी
आज मी *सजले,*
हातात हात घालुनी
सप्तपदी मी *चालले.*

मांगल्याचे प्रतिक घेऊन
सासुरवाशीण *होते,*
प्रेमाच्या या आठवणीत 
मन माहेरीच *फिरते.*
-----------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke नववधू

नववधू #poem