Nojoto: Largest Storytelling Platform

मनी फुलावा मोगरा अन् बहरावी प्रीत अशी तुझं असणही अ

मनी फुलावा मोगरा अन् बहरावी प्रीत अशी
तुझं असणही अस जणू मनी खुलती कळी जशी!

पापण्यात विसावते तुझ्या प्रेमाची पायवाट
किती पावले असतील सोबती, मनी भयदाट!

सलत्या आयुष्यात सुखद गारवा तुझ्यामुळे
गाली हसू उमलते स्वच्छंद, सुखही तुझ्यासवे!

कित्येकदा उमगते मनात रुजलेल अंकुर हे
फुलावे तितके फुलत जाते नात्याचे गूज हे!

आयुष्याच्या वाटा पोरक्या झाल्या जरी कधी
बहरता प्रेम गुलमोहर तूच विसावता या मनामधी!

©Radhika
  #Prem #gulmohar #marathipoetry #premkavita #MarathiKavita #L♥️ve