Nojoto: Largest Storytelling Platform

विरघळून गेली सारी दुःखे खाऱ्या पाण्यात ओठावर फुलले

विरघळून गेली सारी दुःखे खाऱ्या पाण्यात
ओठावर फुलले हसणे अन सुख दिसले डोळ्यात 
मी वळून पुन्हा तिकडे पाहणार नाही आता
सुरुवात नव्याने केली मी आहे जाता जाता

देऊन टाकले सगळे मी कपडे ते विरलेले
सोबत सगळ्या आठवणी अन रडगाणे विटलेले  
ती जुनीपुराणी ओळख सांभाळावी का आता 
सुरुवात नव्याने केली मी आहे जाता जाता

तोच स्पर्श जाणवतो आजही तुझ्या नजरेतुन
तू विसरलास का नाही त्या अस्तित्वाची खूण
ही नजर खालती जाते का जुनी आठवण  येता
सुरुवात जरी ही केली मी आहे जाता जाता

विसरून देत का नाही हा समाज माझा पेशा
भुलतात जरी या इथले अंगावरच्या त्या वेशा
बोचतात नजरेमधले त्यांच्या सवाल जाता येता
सुरुवात जरी ही केली मी आहे जाता जाता

पण हार मानणे नाही हे बजावलेले आहे
मी मनास माझ्या इतके कणखर केलेले आहे
मारोत कितीही सारे मज येता जाता लाथा
सुरुवात नव्याने केली मी आहे जाता जात
---२७/१०/२०२२ @ १३:२८

©उमा जोशी #विधाता_वृत्त_(२-८-४, २-८-४)
विरघळून गेली सारी दुःखे खाऱ्या पाण्यात
ओठावर फुलले हसणे अन सुख दिसले डोळ्यात 
मी वळून पुन्हा तिकडे पाहणार नाही आता
सुरुवात नव्याने केली मी आहे जाता जाता

देऊन टाकले सगळे मी कपडे ते विरलेले
सोबत सगळ्या आठवणी अन रडगाणे विटलेले  
ती जुनीपुराणी ओळख सांभाळावी का आता 
सुरुवात नव्याने केली मी आहे जाता जाता

तोच स्पर्श जाणवतो आजही तुझ्या नजरेतुन
तू विसरलास का नाही त्या अस्तित्वाची खूण
ही नजर खालती जाते का जुनी आठवण  येता
सुरुवात जरी ही केली मी आहे जाता जाता

विसरून देत का नाही हा समाज माझा पेशा
भुलतात जरी या इथले अंगावरच्या त्या वेशा
बोचतात नजरेमधले त्यांच्या सवाल जाता येता
सुरुवात जरी ही केली मी आहे जाता जाता

पण हार मानणे नाही हे बजावलेले आहे
मी मनास माझ्या इतके कणखर केलेले आहे
मारोत कितीही सारे मज येता जाता लाथा
सुरुवात नव्याने केली मी आहे जाता जात
---२७/१०/२०२२ @ १३:२८

©उमा जोशी #विधाता_वृत्त_(२-८-४, २-८-४)