Nojoto: Largest Storytelling Platform

हो.... नाही मी सावित्री आणि नाहीचं मी सीता व्रतस्

हो....
नाही मी सावित्री
आणि 
नाहीचं मी सीता
व्रतस्थ असले तरी
मनात माझ्या काहूर आहे
भलत्याच दिशेची
चाहूल आहे..
मान्य नसेलचं कोणाला
अशी पहाट मी नित्य अनुभवतेयं
चुचकारतं स्वतःला
सत्याला दूर भिरकावतेयं
माहीत आहे तरी
पाऊले चालतात आडवळणावर
का कोणास ठाऊक
इच्छांचे कौतुक होतेयं अनावर
खंत आहेचं आणि आहे धिक्कार
असल्या फालतू इच्छांचा
नसल्या जरी कामवासना तरी
भरकटलेल्या मनाचा
का म्हणून येतोयं भाव
जागृत करणारा देहाला
पीळ का पडत नाही
वळ उठवून जाणिवेला
चरर्र होतयं आतल्याआत
कळ उठतेयं काळजात
का उगा सोस नाहक
सरळसरळ असणाऱ्या आयुष्यात
काय उणे ज्यात मी
निराश व्हावे कमालीचे
भरभरून मिळाल्यावरही का नुसते डोहाळे भिकेचे..थांबून जावा श्वास इथेच असाच जर येणार असेल...मला मी हरवून....मी जिवंत जर राहणार नसेल.....मी माझी.....24/05/2023

©Sangeeta Kalbhor
  हो....
नाही मी सावित्री
आणि 
नाहीचं मी सीता
व्रतस्थ असले तरी
मनात माझ्या काहूर आहे
भलत्याच दिशेची
चाहूल आहे..

हो.... नाही मी सावित्री आणि नाहीचं मी सीता व्रतस्थ असले तरी मनात माझ्या काहूर आहे भलत्याच दिशेची चाहूल आहे.. #शायरी

167 Views