White मनाचा तळ शब्दवेडा किशोर असे मुखवटा रडका हसरा नकली चेहरा मानवाचा कुणाला न कळे कधीच मनाचा रे तळ पकडाया गळ हा न जमे जो असे माशासम सुखाला सगळे दुःखाला नाही कुणी मला कोण वाणी मीच असे मनात पोटात असे एक एक मुरडतो नाक पाठ फिरता तुंबड्या भराया आहे कपटीच वाणी मढ्यावरचे लोणी सारे खात असे मुखवटेवाले हे मनाचे महारोगी रंगी ढंगी सोंगी असे क्षेत्रोक्षेत्री पैसे खाऊनी रे मनेच सडली विश्वासाचा वाली इथं कुणी नाही मानवाची खेळी वासनेच्या पोटी कोण माय बेटी अन् कोण बहीण भाची नसे कळे आहे अनमोल मानवाचा हा जन्म करावे रे सोनं जीवनाचे शब्दवेडा किशोर हे सांगे टाकुनी द्यावा मुखवटा माणुसकीच्या वाटा धराव्यात ©शब्दवेडा किशोर #आयुष्यातीलचारक्षण मराठी कविता