White #आतातरी देवा माझ्या देवावानी वाग रं.... शब्दवेडा किशोर देवा कधी देवळाच्या पायरीला येऊन बघ लोकांना कसे सहज चढवले जाते कागद शेवटी कागदच आहे उत्तरांना कसे इथे सहज उडवले जाते...... शोधू नको काही इतिहासजमा झालेल्या खुणा पुराव्यांना टेबलाखाली सहज दडवले जाते चोर कोणता अन् कोणता साव हे आता चेहऱ्यावर नाही आता जो कैद त्यालाच सहज तुडवले जाते...... कसा पुन्हा उभा राहिला माणूस हे ही समजेल आहे त्या तत्वात कसे सहज घडवले जाते आधीच महाल उभा त्याला पावलात आहे कायम असेच फक्त दाखवले जाते पुन्हा तो खोटा सोनेरी मुकुट फक्त त्याला नव्याने सहज मढवले जाते असे काय वेगळे होईल आता क्रांतीत इथे आजघडीला जुने काही कालबाह्य तसे अगदी सहज सडवले जाते...... ©शब्दवेडा किशोर #देवाअंतनकोपाहू