Nojoto: Largest Storytelling Platform

ना सुखाची ओढ आता ना दुःखाची ही भिती श्वास संपले हे

ना सुखाची ओढ आता
ना दुःखाची ही भिती
श्वास संपले हे प्रतिक्षेत
आयुष्य उरलेच किती
राहीली ना तमा कशाची
कुणास कुणाची आता
जो चाले सदा पुढती
हृदयमंदिराशी जोडलेले
आपण सगळे सखेसोबती
आयुष्यात उरलेच किती
काळाचा महिमा हा सारा
सारीपाट आगळा आयुष्याचा
फिरूनी नव्यानं सारे जन्म घेऊनी
नवी भरारी घेणार पुन्हा एकदा
आपण सारे सखे सोबती
नाही विसरायचे नाते हे अपुले
अन् ना विसरावी आपली मैत्रनीती
पुन्हा नव्यानं उगवाया
आता सजवु ही
छोटीशी अस्तमिती
हृदयमंदिरी आठवणींना ठेवू
कायम जतन करूनी
एकच सांगे हा शब्दवेडा किशोर
कुणी कुणाला न विसरता
फिरूनी नव्यानं लवकरच
करूया जागर मैत्रीचा
अपुला नव्या जोशात
अन् फुलवुया आपल्या
सर्वांच्या आयुष्यरीती

©शब्दवेडा किशोर
  #आयुष्याच्या_वाटेवर