Find the Best आयुष्याच्या_वाटेवर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआयुष्याच्या या वळणावर, आयुष्याच्या या पायरीवर, उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा,
शब्दवेडा किशोर
White माझ्या आयुष्यात मला सगळीच चांगली माणसं भेटलीय.. मी सोडून कुणीच इथं कधीच चुकत नाही.... शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White #नात्यांची जहरी नाळ.... शब्दवेडा किशोर रोज माझ्या उशाला शापित अन् विखारी माझ्याच भूतकाळाच्या आठवांचा काळ सावळीसम माझ्या संगतीस आहे ओठावर नात्यांच्या ओळखीचे नाव अन् डोळ्यात विरहजाळासोबत अजूनही हा गर्दीमय एकटेपणाचा अवघड असा शाप आहे जगण्यासोबतच आता झोपही माझी विझूनी गेलीय तरीही हाती अजूनही स्वप्नांचा तोच लाजिरवाणा सांभाळ आहे हक्काची नाती आयुष्यातून झाली काही काळाआधीच वजा विरली ती त्याला चांदण्यात जरी माझे अजूनही आतुरलेले फाटके अन् रिते कोरडे ते आभाळ आहे नाते सारे भावनांचे इतके सुलभ नसतात हे शिकवणारं माझं दरिद्री भाळ आहे अन् अजूनही कुठंतरी एक अंधुकशी शापित माझ्याशी जोडलेली या साऱ्याची एक जहरी नाळ आहे ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White #आयुष्य माझे हे असे.... शब्दवेडा किशोर आयुष्य हे माझे असे जणू असंख्य वेदनांचे ते माहेरघर भासे सदा तयात अनंत अंतहीन यातनांचा महापूर वसे म्हणून मी जगास " एक शापीत जोकर " ही माझी ओळख मोठ्या गर्वाने नेहमी सांगतसे.... नजर नियतीची चुकवूनी कधी येती सुखलहरी माझ्या जिवनी त्यांना मनाच्या कोंदणात मी सदा सुवर्णसाजासम जपतो जरावेळ त्या सुखक्षणांशी संवाद मनीचा मनासाठीचा साधुनी पुन्हा नव्यानं माझ्या शापीत आयुष्याची काटेरी वाट मी अखंड चालतो... संपेल जव माझ्या आयुष्याची ही अनोखी श्वासलय येईल तेधवा सर्वांना माझ्या काही क्षणभंगूर आळवणींची सय ती अन् लाभेल तेधवाच बहुधा माझ्या मिटलेल्या आयुष्यपाकळीला नवे वादळरूपी वलय.... ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White #अव्यक्त प्रेमाची भाषा.... शब्दवेडा किशोर न बोलता तू समजून घे माझ्या न बोललेल्या भावनांना शब्दांच्या भिंती पलीकडे असलेल्या माझ्या मनीच्या गूढ कोपऱ्यांना डोळ्यातलं बोलणं माझ्या तू वाचशील का ओठांनी न व्यक्त झालेलं भावनांचं जाळं मुक्त करुनिया हृदयीच्या तारा तू छेडशील का स्पर्शही न झालेलं अव्यक्त गुज तू नव्याने व्यक्त करशील का गर्दित असलो सदा तरी असे एकटाच मी शोधितो नेहमी तुझ्या नजरेत माझा देहनिवारा कधी समजशील तु माझ्या मनीचं अबोल गुज असे अबोल गुपीतांचा हा खेळ निराळा सारा आसवांना माझ्या शब्दांची गरज नसते हसण्यातही सदा माझ्या वेदनांची लकेर वसते घे आतातरी समजून माझ्या मुक्या भावना अन् घे समजून माझ्या हृदयीची भाषा दे आधार या मना अन् शब्द ओठातुन निघण्याआधीच ओळख तु माझ्या अमोघ अन् अबोल अव्यक्त अशा प्रेमाची भाषा ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White #ऋण.... शब्दवेडा किशोर जन्म घेतला तेव्हाच मी नियतीनेच मला दिलेला अदृश्य शाप मी स्वीकारला आजवर सदा इतरांच्या दुषणांच्या ऋणांचा भार जपत कायम मी हसत राहूनी एक शापीत जोकर हा माझा बनलेला ओळखीचा आकार जपला आजवर खुप साहिले दुःख मी आजवर खुपदा सदा टोमण्याचे हार गळा घालुनी मीच माझे हे शापित अस्तित्व सजवून ठेवियेले मी हरणार नाही खचणार नाही माझं अस्तित्व मी सहजासहजी मिटू देणार नाही मी वेळ आलीच तशी देखील कधी तर या जन्मीचे मजवरचे सगळ्यांचे असलेले ऋण फेडल्याशिवाय प्रभुचरणी लीन होणार नाही मी ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White #मी कवी नाही.... शब्दवेडा किशोर मी छान लिहितो..असं जवळचे म्हणतात...मी भावना व्यक्त करतो पण त्या जो कवीमनाचं असतो किंवा ज्याला खरंच माणसातलं माणूसपण कळतं त्यालाच कविता समजतात पण मीच स्पष्ट करतो..मी कुणीही कवी नाही व हे जे काय लिहितोत्याचं श्रेयही माझं नाही.ती जीवनात येण्याआधीही मी लिहायचो पण मला असं वाटतं की माझ्या लेखणीला खरी धार ती आयुष्यात आल्यानंतर मिळाली.ती आयुष्यात आली अन् नकळत मी कधी अलगदपणे तिच्या सहवासात गुंतत गेलो,गुरफटत गेलो ते मला कळलं देखील नाही अन् स्वतःला शब्दात कसा हरवत गेलो तेही मज उमजलं नाही. आधी माझ्या कविता आणि लेख हे फक्त लिखाण होतं असं मला वाटतं पण आता ती जीवनात आली आणि बहुधा माझ्या लेखणीस नवी प्रेरणा मिळत गेली.हल्ली माझ्या कविता म्हणजे जास्त करून तिचा न माझा अदृश्य स्वरूपातला संवाद असतो.ती जवळ नसतानाही तिच्याच धुंदीत जगण्याचा तो एक बहाणा असतो.बहुतेक तीच माझ्या लेखणीतलं शब्दस्वरूप होऊन मला सतत भेटत असते अन् माझ्या मनीच्या भावना कागदावर उतरवत असते.हे शब्दच माझं आता बहुतेक जगण्याचं नवं स्वरूप झालं आहे अन् अजूनही या सगळ्यात मी काही खुप मोठा लेखक किंवा कवी नाही एवढंच तुम्हा सर्वांना सांगणं आहे. ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
Unsplash #जग हे बंदिशाला.... शब्दवेडा किशोर आठवतंय मला..छोटा होतो जेव्हा मी तेव्हा जगच खूपच मोठं होतं..तो शाळेचा रस्ता व कोपऱ्यावरचं ते सायकलचं दुकान,तो बर्फाचे गोळे विकणारा काका आणि फुले गजरे खेळणी विकणारा छोटा मामू..सारं काही कुठं हरवलं गेलंय..आता तेथे मोबाईलचं व व्हीडीओ गेमचं पार्लर जिथं गर्दी असते पण तरीही सारं कसं रिकामं रिकामं वाटतंय..बहुतेक माणूस आता छोटा होत चाललाय... आठवतंय मला छोटा होतो जेव्हा मी तेव्हा होणारी संध्याकाळही खूप मोठी असायची.तासनतास ते पतंग उडवणं व बेभान सायकलींच्या शर्यती व मग दमून घरी येणं..आजकाल संध्याकाळच होत नाही.दिवस संपतो न संपतो तोच रात्रीचा वेळही बहुधा छोटा होत चाललाय.. आठवतंय मला..छोटा होतो जेव्हा मी तेव्हा मैत्री खूप गाढ असायची..तेव्हाचं ते मित्रांच्या घरी जाणं किंवा त्यांना घरी बोलावणं,कुणाकडेही खाणं,तिथेच मनसोक्त खेळणं,सुख दुःख वाटून जगणं..आताही मित्र आहेतच पण मैत्री हरवून गेलीय..कधीतरी कुणी रस्त्यात दिसलाच तर फक्त हाय हॅलो होऊन लगेच वाट वेगळी होते.कोणत्याही शुभेच्छेसाठी असतो फक्त एक कोरडा SMS,निर्विकार,भावनाहीन, केवळ कर्तव्यपूर्तीचा..आजकाल नातीही बदलत चालली आहेत. आठवतंय मला..छोटा होतो जेव्हा मी तेव्हा खेळ पण किती मस्त असायचे..विटी दांडू, लपंडाव,पळापळी,आट्यापाट्या...आता घरी इंटरनेट टीव्ही आहे फक्त वेळ शिल्लक नाही. आजचं आयुष्यही बदलत चाललंय..हे आयुष्याचं गाणं फारच छोटं असतं रे मित्रा..इथं "उद्या" कुणीच पाहिलेला नसतो..हा येणारा " उद्या " फक्त स्वप्न आहे.. आताचाच क्षण आहे खरा जगण्याचा..या हव्यासाच्या जगात आपण फक्त पळतोय वेड्यासारखे..मित्रा हे आयुष्य पुन्हा नाही मिळणार..जगायचं तर आत्ताच जगून घे नाहीतर स्मशानाच्या फाटकावरील पाटीप्रमाणे होईल.. " शेवटी इथेच यायचं होतं..पण येता येता सारं आयुष्य संपून गेलं.." ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
Unsplash #स्वतःसाठी जगण्याचे नवे बहाणे.... शब्दवेडा किशोर आपल्याला आयुष्य कळायला तसा फारच उशीर होतो ना..प्रत्येक पावलावर नवीन वाटा..नवीन माणसं..नवीन अनुभव..दरवेळी नवीन क्लेश..नवी घुसमट..कधीतरी क्वचितच तसा भेटणारा नवा तो दुर्मिळ आनंद..आयुष्याला नेमकं स्थिरत्व लवकर कुठं भेटतं तेच कळत नाही अन् कधीकधी तर सारं कळतं पण वळत नाही आणि कधी कळुनही उपयोग होत नाही कारण योग्य निर्णयाची वेळच हातून निसटलेली असते. या साऱ्यात मग आपसूकपणे आपलं वय कधी पुढे निघून जातं ते कळतच नाही अन् मग एखाद्या वळणावर जाऊन आपलं क्षितिज आपणाला दिसू लागतं..मग गवसू लागतात आपलेच हरवलेले तराणे.. तेच सांगू लागतात.. स्वतःसाठी जगण्याचे नवे बहाणे.... ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
Unsplash #हा खेळ नियतीचा शब्दवेडा किशोर परिस्थितीशी घालून मेळ नियतीचा आहे सदा चालू असतो अजब हा खेळ संपेल कधी माहीत नाही प्रत्येक जीवाची वेळ मनात तर कायमच झालेली असते खूप विचारांची नुसती भेळ...... आलेला दिवस न्यायचा कसाबसा रेटून एकमेकांशी चांगला सलोखा राखून कुणास ठाऊक कोण आलं कुठून भेटेल का कुणी असा जो असेल जगात जिवंत जीवनातले गूढ मर्म ओळखून...... खेळ हा प्रत्येकाचा असे क्षणभरच्या त्या औट घटकेचा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा नव्हे हा सूर त्या वडाच्या पारंब्याचा हा खेळ असतो तर केवळ आपल्या नशीबाचा...... खेळात नाही हार अन् जीत जोडूनिया जगायचे सर्वांशी प्रित हिच तर आहे या खेळाची खरी रीत हीच रीत जपूनिया सदा आपण मात्र हसत हसत दुःखांना लपवत गुणगुणायचे हे जीवनगीत...... ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
शब्दवेडा किशोर
White #सौभाग्याचं लेणं.... शब्दवेडा किशोर दोन बोटांच्या चिमटीत दोन जीवांचं जगणं हिरव्या साडीच्या जोडीला असतं लाल कुंकवाचं लेणं ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर