Nojoto: Largest Storytelling Platform

...... पण नियतीच्या मनात काय आहे? हे कोणास ठाव अस

...... पण नियतीच्या मनात काय आहे?
 हे कोणास ठाव असते... 
अनाहूत पणे भेटणाऱ्या प्रवासीप्रमाणे... 
ती ही भेटते प्रत्येकाच्या जीवन प्रवासात एकदातरी.. 
प्रवासी ते प्रेयसी हा प्रवासाचा टप्पा तर भलताच न्यारा असतो.. 
शब्दांना अर्थ उमगतात, भावनांचा उगम होतो.. 
संगमाच्या उत्तेजनांचा कहर मनाच्या 
महासागरात एक लहर घेवून येते .. अशी लहर 
जिच्यात अगणित सुनामी आपल्या 
अस्तित्वाची हमी देत पुढे सरसावत... 
दोन बिंदूत विभवांतर निर्माण होते 
आणि प्रेमाच्या परमोच्च बिंदू प्राप्त करण्यासाठी 
एक प्रचंड उर्जा प्रवाह निर्मित होतो दोन बिंदू मध्ये... 
परंतू ही ओढच असते जी 
स्फोटकाच्या दिशेने वाटचाल घडवून आणते.. 
सर्व काही घडत असताना कर्त्याचा ताबा 
कर्म घेण्यास सुरुवात करते आणि 
घटना ठरवते घटनाकराचे भविष्य.... 
जे कदाचित भूतकाळातील खोल गर्तेत
 घेवून जाणारे असते...जिथे माणूस 
स्वतःस केंद्रबिंदू ठेवून निरनिराळया परिघाची वर्तुळे
 स्वतःच घोटत बसलेला आढळतो....
त्रिज्या जरी बदललेल्या असल्या तरी अस्थिर मनाचा 
केंद्र मात्र अगदी स्थिर आणि अढळ असतो.. 
ह्या गर्तेतून कदाचित बाहेर येता येईल ही 
अथवा नाही देखील.... 
परंतू तिथे राहण्याचा निर्णय मात्र 
व्यक्तीस मोहात पाडत राहतो... 
ह्या द्वंद्वातून सुटका हवी असेल तर 
अर्जुनाला श्री कृष्णाची मदत घ्यावीच लागते.. 
तेव्हा कुठे ह्या महाभारताच्या 
समारोपाच्या आशा उंचावतात.........
@ओम बाविस्कर #shayari #inspiration #Poetry #nazm #reality #marathi #MarathiKavita