Nojoto: Largest Storytelling Platform

श्रद्धेचा बाजार अरे माणसा तू जातोस रोज धार्मिक

श्रद्धेचा बाजार 

अरे माणसा तू जातोस 
रोज धार्मिक स्थळी…
मग तू सांगच रोज तुझ्या 
पदरात किती पडते गंगाजळी..?

विचार करायला लागलास ना
गेला ना भावनेच्या आहारी..
हा प्रश्न विचारला म्हणून 
लागलं ना तुझ्या जिव्हारी…!

किती रे लुटले तुला
तरी तू नाही माघारी हटला..
मला ठाऊक आहे सारे
यातच संसार तुझा रे फाटला…!

अफाट श्रद्धा, अफाट विश्वास
किती हा तुझा भाबडेपणा
समजते तुला सर्व काही
तरी म्हणणार हा माझा देवभोळेपणा

श्रद्धा ठेव, विश्वास ठेव
ठेव स्वतःच्या कर्तृत्वा वर आस्था
जाऊ नका अंधश्रद्धेच्या आहारी
नाही तर खुंटेल तुझ्या प्रगतीचा रस्ता…!

कवी - किशोर चौरे
8975227531

©Kishor Chaure श्रद्धेचा बाजार, विकासाला खीळ...?
श्रद्धेचा बाजार 

अरे माणसा तू जातोस 
रोज धार्मिक स्थळी…
मग तू सांगच रोज तुझ्या 
पदरात किती पडते गंगाजळी..?

विचार करायला लागलास ना
गेला ना भावनेच्या आहारी..
हा प्रश्न विचारला म्हणून 
लागलं ना तुझ्या जिव्हारी…!

किती रे लुटले तुला
तरी तू नाही माघारी हटला..
मला ठाऊक आहे सारे
यातच संसार तुझा रे फाटला…!

अफाट श्रद्धा, अफाट विश्वास
किती हा तुझा भाबडेपणा
समजते तुला सर्व काही
तरी म्हणणार हा माझा देवभोळेपणा

श्रद्धा ठेव, विश्वास ठेव
ठेव स्वतःच्या कर्तृत्वा वर आस्था
जाऊ नका अंधश्रद्धेच्या आहारी
नाही तर खुंटेल तुझ्या प्रगतीचा रस्ता…!

कवी - किशोर चौरे
8975227531

©Kishor Chaure श्रद्धेचा बाजार, विकासाला खीळ...?

श्रद्धेचा बाजार, विकासाला खीळ...? #मराठीसंस्कृति