Nojoto: Largest Storytelling Platform
kishorchaure3614
  • 3Stories
  • 8Followers
  • 13Love
    0Views

Kishor Chaure

मुक्त विचारधारा आणि कवी मन...!

  • Popular
  • Latest
  • Video
1bcd5e7e3ddfd6cc90957903ca7f10af

Kishor Chaure

श्रद्धेचा बाजार 

अरे माणसा तू जातोस 
रोज धार्मिक स्थळी…
मग तू सांगच रोज तुझ्या 
पदरात किती पडते गंगाजळी..?

विचार करायला लागलास ना
गेला ना भावनेच्या आहारी..
हा प्रश्न विचारला म्हणून 
लागलं ना तुझ्या जिव्हारी…!

किती रे लुटले तुला
तरी तू नाही माघारी हटला..
मला ठाऊक आहे सारे
यातच संसार तुझा रे फाटला…!

अफाट श्रद्धा, अफाट विश्वास
किती हा तुझा भाबडेपणा
समजते तुला सर्व काही
तरी म्हणणार हा माझा देवभोळेपणा

श्रद्धा ठेव, विश्वास ठेव
ठेव स्वतःच्या कर्तृत्वा वर आस्था
जाऊ नका अंधश्रद्धेच्या आहारी
नाही तर खुंटेल तुझ्या प्रगतीचा रस्ता…!

कवी - किशोर चौरे
8975227531

©Kishor Chaure श्रद्धेचा बाजार, विकासाला खीळ...?

श्रद्धेचा बाजार, विकासाला खीळ...? #मराठीसंस्कृति

3 Love

1bcd5e7e3ddfd6cc90957903ca7f10af

Kishor Chaure

माणसानं माणुसकी जपावी

आपल्या जीवन सौख्यासाठी

परिजनांची आठवण ठेवावी

आयुष्याच्या सुर मधुर गोडव्यासाठी


राहावे सतत आनंदी दुनियेत

आपल्या हसऱ्या भावनेसाठी 

हसावे मनभर अन् काकणभर

संसाराचा गाडा हाकावा प्रेमळ कुटुंबासाठी


दुःखाचे रूपांतर व्हावे सुखात

सतत बहरावे निर्मळ निसर्ग सौंदर्यासाठी 

का कधी वेळ कशी येईल

हे न सांगून ठेवण्यासाठी


होतास कुठेतरी हरवलास 

स्वतःच्या समस्यांच्या पाठी

अरे मग शोधास कर सुरवात 

नक्कीच सापडेल मग कोण आहे ह्या ओझ्यापाठी


कधी डोकावलास, विचारले स्वतःच्या मनास

एवढ्या खस्ता खाल्यास कोणासाठी

एकदा निवांत डोळे झाकच

मग सापडेल उत्तर कोण होते ह्या अदृश्य पडदयापाठी



कवी - किशोर चौरे
         8975227531

©Kishor Chaure #माणुसकी
1bcd5e7e3ddfd6cc90957903ca7f10af

Kishor Chaure

अन्यायाची परिसीमा.....!


खस्ता खात जगतांना 

जखमांना अक्षरशः खपल्याही येत नाही...

अन् जगण्याचा खरा आनंद

कुठे कसाच नजरेस पडत नाही...


सकाळ, दुपार, संध्याकाळ अन् काळोख्या रात्री

होत असतो सारखा अन्याय तरीही मनास जाग कशी येत नाही...

अन् ह्या अन्यायाच्या लख्ख प्रकाशात

न्यायाचे कधी द्वारच उघडत नाही...


समाजातील प्रत्येक घटक अन् घटक पेटून उठतो जीवावर सदैव

पण एकदाचा पेटवून काहो टाकत नाही..?

तेच रडगाणे रोजचेच तीच उपेक्षा दीनचीच

एकदाचे सर्व संपवून टाकण्याचे धाडस का हो नाही..?


किती पिळलो, गेलो किती छळलो

अन् तरीही ह्या होणाऱ्या वेदनांचा आक्रोश तोंडून फुटतं नाही...

आता नाहीच सहन करायचा हा दुराचार अन् पेटून उठलो

पण मलाच दुराचारी का होता येत नाही...


कितीही प्रयत्न केला विद्रोह करण्याचा 

मात्र विद्रोहाची भाषाच तोंडून फुटत नाही...

आता मात्र एकदाची संपूच दे सहनशीलतेची परिसीमा

मग एकही तिळमात्र अन्याय कदापिही सहन करणार नाही...!


कवी - किशोर चौरे
(जिल्हा परिषद शाळा ताडाचीवाडी)
   8975227531 च

©Kishor Chaure अन्यायाची परिसीमा

#अन्यायाचीपरिसीमा

अन्यायाची परिसीमा #अन्यायाचीपरिसीमा

4 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile