Nojoto: Largest Storytelling Platform

#जगणे! दुनियेच्या या बाजारात सुखासीन झालो

#जगणे!

      दुनियेच्या या बाजारात
  सुखासीन झालो असतो
       जर मी थोडासा
  लाचार झालो असतो.

       विकून मी स्वाभिमानाला
  सुखाचे घोट प्यालो असतो
       माझ्याच नजरे मध्ये
  नक्कीच उतरलो असतो.

       घोळला असता गोंडा
  इमानदार ठरलो असतो
      अस्तित्व माझे मीच
  विसरून गेलो असतो.

       चाटले असते तळवे
  उच्च पदी बसलो असतो
        राजाच्या दरबारातील
  विदूषक दिसलो असतो.

       स्वाभिमानी पूर्वजांचा
  गुन्हेगार ठरलो असतो
       पाठीचा कणा मोडून
  जर मी जगलो असतो!

©Sapankar Sir
  जगणे...
sapankarsir6637

Sapankar Sir

New Creator

जगणे... #मराठीविचार

93 Views