Nojoto: Largest Storytelling Platform

आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,ना

आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची..
हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसतेच रे तुझ्याकडून मला काही हवं असणं..
आणि सांग ना..का असायला हवं काही तुझ्याकडून मला..
असंही आपलं शब्दांचं नातं..शब्दाशब्दांनी फुललेलं आणि शब्दांपुरतचं उरलेलं..
तसा मी माळलाय श्वास माझ्या श्वासात तुझा..
पण..पण...तुला हे कसे कळावं..
आणि तुला कळून यायला तरी मी कुठे हट्ट केलाय..
ठरवलेच होते तसेच आणि तसेच वागतेय मी..
शब्दांतून जगतेय तुला..शब्दांतूनच जगवतेय मला..
तक्रार..सांग ना कुठल्या गोष्टीची करु...
तू ना कधी भेटलास मला ना कधी भेटणार...
निर्विकार असं एक रुप तुझं जे शब्दाशब्दात मला गवसत..त्याकडे कशी बरं तक्रार मी करायची..
मला तरी नाही रे जमणार...मग काहीही झाले तरी..
तू मला तुझी मानतोस की नाही या फंद्यातही नाही पडायचे मला..कारण त्याने माझ्यात काहीही फरक पडणार नाही...तसूभरही...
मी तुला मानते..मी तुला माळते एवढे बस आहे माझ्यासाठी आणि तुझ्यावर असलेल्या प्रीतीसाठी..
नकोचं भेट आणि नकोचं बोलणं थेट...
शब्द आहेत की भाव व्यक्त करायला आणि तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करायला...
आताशा मला कसलाही त्रास होत नाही रे..कसलाचं..
तू मला block कर अथवा unblock
मी मस्त असणार आहे माझ्या विचारात ..माझ्या शब्दात ..ज्या शब्दात तू असणार आहेस..
तू नसूनही असणारचं आहेस शब्दात तेव्हा देहरुपाने असाणाऱ्या अस्तित्वापेक्षा निश्चल ,निर्विकार रुप मला भावतं..फक्त मी मग्न आहे ना याला महत्त्व आणि हेचं बघ माझं तत्व..
नको असताना झाली प्रीती आणि बसले मी चित्त तुला अर्पूण...
आता यायला हवी अविस्मरणाची लाट जी मला माझेपण हरवून दूर घेऊन जाईल...क्षितीजापल्याड..जिथे जाणीवचं हरवून जाईल...
माझी नसण्याचीही..
आणि उरणार नाही मग त ही तक्रारीचा 
जो तुझी तक्रार करु शकेल...
कळत नकळत .....
पण ऐक हं...
तू कितीही दूर गेलास किंवा लपलास कुठेही..तरी नाही कमी व्हायची माझी प्रीती जी माझ्यावरही नाही होऊ शकणार माझ्याच्याने कधीचं...
कळेल का एवढे रे तुला..मी न सांगता न मागता देशील का माझ्या शब्दात माळण्याचा हक्क...जो मला हवा आणि हवाचं आहे....कायमस्वरूपी.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची..
हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसतेच रे तुझ्याकडून मला काही हवं असणं..
आणि सांग ना..का असायला हवं काही तुझ्याकडून मला..
असंही आपलं शब्दांचं नातं..शब्दाशब्दांनी फुललेलं आणि शब्दांपुरतचं उरलेलं..
तसा मी माळलाय श्वास माझ्या श्वासात तुझा..
पण..पण...तुला हे कसे कळावं..
आणि तुला कळून यायला तरी मी कुठे हट्ट केलाय..
ठरवलेच होते तसेच आणि तसेच वागतेय मी..

#ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसतेच रे तुझ्याकडून मला काही हवं असणं.. आणि सांग ना..का असायला हवं काही तुझ्याकडून मला.. असंही आपलं शब्दांचं नातं..शब्दाशब्दांनी फुललेलं आणि शब्दांपुरतचं उरलेलं.. तसा मी माळलाय श्वास माझ्या श्वासात तुझा.. पण..पण...तुला हे कसे कळावं.. आणि तुला कळून यायला तरी मी कुठे हट्ट केलाय.. ठरवलेच होते तसेच आणि तसेच वागतेय मी.. #शायरी

315 Views