पहिला पाऊस पहिली सर.. सुगंध खाली बिजली वर.. रान वाट झाली ओलीचिंब.. ओघळती गालावर पाण्याचे थेंब.. धरती झाडांना जणू आलाय जीव.. तापलेल्या सूर्याची वाटावी कीव.. वारा ही करू लागलाय भ्रमंती.. खुणावतोय सर्वाना घ्या विश्रांती.. घटकाभर पडून म्हणे करतो सगळं शांत.. निघून जाईन नदी वाटे भेटावया प्रशांत.. -विपुल तांबे. #raindrops #firstRain