आखाडा .... घायाळ वाघ एक फिरतो आहे महाराष्ट्राच्या जंगलामध्ये ! नेते काही रुसले आता शिवसेनेच्या अंगणामध्ये ! बरी चालली होती की हो तीनतिघाडी ठमठम गाडी विचारांची कुचकुच होती बेरिंगीच्या वंगणामध्ये ! राणे , सुमय्या , ईडीचाही त्रासच होता आजपावतो भडकून दिली हवा कुणी हो बाॅलीवूडच्या कंगणामध्ये ? आता तर बरखास्तच केला आखाडा अवघाच्या अवघा कोण हारले कोण जिंकले पैलवानीच्या रिंगणामध्ये ! सतीश दिलीपराव देशमुख शेंबाळपिंप्री.ता.पुसद जि यवतमाळ . ©Satish Deshmukh आखाडा...