Nojoto: Largest Storytelling Platform

#-शब्दशिल्प समुह आयोजित #-ऑडिओ अभिवाचन उपक्रम वि

#-शब्दशिल्प समुह आयोजित 
#-ऑडिओ अभिवाचन उपक्रम 
विषय:- बाभुळ
दिनांक:- २१\०७\२३

बाभुळ
एकाच गावच्या बाभळी आणि बोरी
म्हण प्रचलित आहे जगजाहीर 
कडु-गोड जीवनात दृष्टांत मिळे
गावकुसाचे संरक्षण करण्यास झाडे माहिर!

बारीक पानांचे झाड बाभळीचे
टोकदार काट्यांचा ताज त्यावर फुले!
घरटे बांधुन कोळीकिटक झाडावर
आवडीने त्यावर झुले.!

दातांच्या मजबुतीसाठी गुणकारी
बाभळीच्या झाडाच्या बिया!
बबुल टूथपेस्ट बाभळीवर प्रकिया करुन 
मिळे बाभळीची मानवाला छाया!

टोकदार सुईसारखे बाभळीचे काटे
रुतला पायात काच किंवा काटा!
शेतकरी बाभळीच्या काटा वापरुन
चालतो रानात बेधुंद आपल्या वाटा!

जनावरे रानातील मस्त
बाभळीचा पाला व बिया खाऊन जगे!
शेळ्या,मेंढ्या व गुरांचे दात होई सशक्त
वन औषधी म्हणून बाभळीचे जुडती धागे!

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  #झाडक

झाडक

27 Views