White #गाव माझ्या काळजाचा.... शब्दवेडा किशोर तुही घेतलास आज ठाव माझ्या काळजाचा सांग ना वाचलास का कधी भाव माझ्या काळजाचा मी जळतो आहे कधीचा इथे नियतीकडून मिळणाऱ्या अनेक दुःखांना पांघरून सांग ना पाहिलास का कधी काव माझ्या काळजाचा तू आधीच जा उधळून मनाला वाढव अंतर हे तुझ्या माझ्यात सांग ना ऐकलास का कधी साव माझ्या काळजाचा कळत-नकळतपणे नव्याने आता पुन्हा उठवू नको मनाला माझ्या सांग ना पाहिलास का कधी गाव माझ्या काळजाचा ©शब्दवेडा किशोर #गावातल्यागोष्टी