Nojoto: Largest Storytelling Platform

White स्वप्ना मागे पळताना माझ्यात मी हरवलो.. हरवत

White स्वप्ना मागे पळताना 
माझ्यात मी हरवलो..
हरवताना जगात या 
स्वतःच मी  दुरावलो..

जबाबदारीच्या ओझ्याने 
अगदीच मी भारावलो..
भारावलेल्या आयुष्याला
जगायलाच मी विसरलो ..

 उगाच का बरं पळतोय 
अजूनहि नाही समजलो..
एकवेळ समजलं गेलं मला 
पण तरीही नाही थांबलो..?

पण तरीही नाही थांबलो..?

©गोरक्ष अशोक उंबरकर
  तरीहि नाही थांबलो

तरीहि नाही थांबलो #मराठीकविता

90 Views