Nojoto: Largest Storytelling Platform

|| निरागसता || आईवरचं प्रेम तुझं चेहर्‍यावरू

|| निरागसता ||

आईवरचं प्रेम तुझं 
    चेहर्‍यावरून ओसंडतय
त्या प्रेमाची ऊब मला
     फोटोतही जाणवतेय || 

निरागस आहेस तोवर 
      असाच कुशीत राहशील
पंखात बळ आलं की
       भूर्रर्र.... उडून जाशील ॥ 

तुझ्या रम्य बाळलीलांनी 
         आयुष्य माझं बहरलं
तुझ्या मुग्ध स्मिताने
          जीवन माझं उजळलं ॥ 

हसत राहा, बहरत राहा
      सर्वांचे जीवन फुलवत राहा
तुझ्या तीव्र बुद्धीने 
       सारे जग जिंकत राहा ॥ 

तुझ्या प्रज्ञाक्षमतेला
    नको दिशांचे बंधन
तुझ्या सद् विचारांचे
       राहो सुमंगल गठंन ||

                        ...........आकांक्षा केळकर

©Akanksha Kelkar #momsonlove
|| निरागसता ||

आईवरचं प्रेम तुझं 
    चेहर्‍यावरून ओसंडतय
त्या प्रेमाची ऊब मला
     फोटोतही जाणवतेय || 

निरागस आहेस तोवर 
      असाच कुशीत राहशील
पंखात बळ आलं की
       भूर्रर्र.... उडून जाशील ॥ 

तुझ्या रम्य बाळलीलांनी 
         आयुष्य माझं बहरलं
तुझ्या मुग्ध स्मिताने
          जीवन माझं उजळलं ॥ 

हसत राहा, बहरत राहा
      सर्वांचे जीवन फुलवत राहा
तुझ्या तीव्र बुद्धीने 
       सारे जग जिंकत राहा ॥ 

तुझ्या प्रज्ञाक्षमतेला
    नको दिशांचे बंधन
तुझ्या सद् विचारांचे
       राहो सुमंगल गठंन ||

                        ...........आकांक्षा केळकर

©Akanksha Kelkar #momsonlove