बिलगल्या उन्हाला आज किती दिसांनी सावल्या गुंतले क्षण ते हळवे गोठल्या निमिष जागल्या स्पंदनांच्या गोड लकेरी भान देहाचे ना उरलें दाटले मेघ वळीवाचे विरहाचे उन्हाळे सरले मोहरे लता लाजूनी अंतरात ओढ तरुची कोशात लपेटून घेता तृप्त झाली तृषा युगाची मधुगंध दरवळे ओला साजरा प्रणय सोहळा हळदीचा रंग नभाला मेहंदीस नवा उजाळा तारकांची शुभ्र लेणी विलसती अजूनही नभा साक्ष देती संगमाची सागरी चांद तो उभा एकरूप झाले दोन्ही भेद सारे गळून गेले हळुवार स्पर्शीता तारा झंकारून गीत आले ©Shankar kamble #प्रेम #विरह #प्रणय #लव्ह #प्रेमकवि #प्रेम💕 #together