Nojoto: Largest Storytelling Platform

°चला पेटवूया होळी° राग लोभ मत्सराची, आज करुया खा

°चला पेटवूया होळी° 

राग लोभ मत्सराची, आज करुया खांडोळी 
जात पात द्या आहुती, चला पेटवूया होळी 

ऋतू वसंत घेऊन, सण शिमग्याचा आला 
ज्वाला त्या धगधगती, पहा कशा गगनाला 

हेवे दावे विसरून, दूर सारू वैर भाव 
सर्व धर्म एक मानू, सोडू सारे भेदभाव 

भांग पिऊ प्रेमरूपी, नशा चढवू नेकीची 
बोबो बोबो बोंब मारू, मिठी मारुया एकीची 

नांदू गुण्या गोविंदाने, रंग रंगात मिसळू 
निळा भगवा हिरवा, चला आनंदाने खेळू

हाच असे क्षण खरा, चला खेळूया रे होळी 
गोड धोड भरू मुखी, आज पुरणाची पोळी 

--------------------------------------

©•देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
dhamanikarsahityik.art.blog 
jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav होळी रे होळी
°चला पेटवूया होळी° 

राग लोभ मत्सराची, आज करुया खांडोळी 
जात पात द्या आहुती, चला पेटवूया होळी 

ऋतू वसंत घेऊन, सण शिमग्याचा आला 
ज्वाला त्या धगधगती, पहा कशा गगनाला 

हेवे दावे विसरून, दूर सारू वैर भाव 
सर्व धर्म एक मानू, सोडू सारे भेदभाव 

भांग पिऊ प्रेमरूपी, नशा चढवू नेकीची 
बोबो बोबो बोंब मारू, मिठी मारुया एकीची 

नांदू गुण्या गोविंदाने, रंग रंगात मिसळू 
निळा भगवा हिरवा, चला आनंदाने खेळू

हाच असे क्षण खरा, चला खेळूया रे होळी 
गोड धोड भरू मुखी, आज पुरणाची पोळी 

--------------------------------------

©•देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
dhamanikarsahityik.art.blog 
jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav होळी रे होळी
devanandjadhav3540

Devanand Jadhav

New Creator
streak icon19

होळी रे होळी #मराठीकविता