Nojoto: Largest Storytelling Platform

आषाढ माहिना येता विठुवारीची चाहूल लागली दिंडीला ज

आषाढ माहिना येता 
विठुवारीची चाहूल लागली
दिंडीला जाण्याची इच्छा 
मनी प्रकट झाली 

ललाटी लावुनी चंदन 
हाती घेतला मृदुंग
तुळशीच्या सुवासात 
मन झाले हे दंग 

चाललो वारी
होई विठुनामाचा गजर
चंद्रभागेच्या तीरावरील 
पंढरपूरासी नजर 

आसुसलेले डोळे घेवुनी
आले आहेत वारकरी
दर्शन देण्यास सज्ज
माझा विठु विठेवरी 

घरी आल्यानंतरही 
विठुरायाची आठवण आली
आई बापाकडे पाहता
विठु रखुमाईची प्रचिती आली
                                   - शंतनू कोळेकर

©Shantanu Kolekar #vitthalrakhumai #pandharpurvari
आषाढ माहिना येता 
विठुवारीची चाहूल लागली
दिंडीला जाण्याची इच्छा 
मनी प्रकट झाली 

ललाटी लावुनी चंदन 
हाती घेतला मृदुंग
तुळशीच्या सुवासात 
मन झाले हे दंग 

चाललो वारी
होई विठुनामाचा गजर
चंद्रभागेच्या तीरावरील 
पंढरपूरासी नजर 

आसुसलेले डोळे घेवुनी
आले आहेत वारकरी
दर्शन देण्यास सज्ज
माझा विठु विठेवरी 

घरी आल्यानंतरही 
विठुरायाची आठवण आली
आई बापाकडे पाहता
विठु रखुमाईची प्रचिती आली
                                   - शंतनू कोळेकर

©Shantanu Kolekar #vitthalrakhumai #pandharpurvari