संपली वर्ष चौदा वनवासाची पाऊले चालती वाट अयोध्याची सजली अयोध्या नगरी सारी प्रभू रामच्या स्वागतासी सजली घरे रंगली दारे लागले दिवे अंगणी उजळुनी निघाली भारत भूमी प्रभू रामाच्या स्वागतासी मुखी श्री रामाचे श्लोक टाळ मृदंगाच्या गजरात झाले भक्तीमय वातावरण नगरी प्रभू रामच्या स्वागतासी सजले स्वयंपाकघर मिठाईत उत्सवात वाटे मिठाईचा गोडवा हर्ष उल्हासाचे वातावरण नगरी प्रभू रामच्या स्वागतासी ढोल ताशांच्या गजरात झाले आगमन प्रभू रामाचे जल्लोश झाला साऱ्या अयोध्या नगरी झाली सुरवात दीपोत्सवाची #NojotoQuote दीपोउत्सव