Nojoto: Largest Storytelling Platform
shaileshbade7624
  • 15Stories
  • 7Followers
  • 121Love
    245Views

shailesh bade

  • Popular
  • Latest
  • Video
8e040715173f88fc6b465f20a933df7e

shailesh bade

रंगात रंगूया
होळी उत्सवात नाहुया
जाळून दुःख सारी
नवी सुरवात करूया

रंग प्रेमाचे उधळूया
सप्तरंगांत नाहुया
पुरणपोळीचा आस्वाद घेऊया
गोडवा नात्यांचा वाढवूया

अंधारातुनी तेजाकडे जाऊया
दृष्ट विचारांची राख करूया 
ठेवूनी संस्कृतीचा मान
उत्सव होळीचा साजरा करूया

©shailesh bade
  #Holi
8e040715173f88fc6b465f20a933df7e

shailesh bade

ram lalla 


जय श्री राम

राजतिलक की  है तैयारियां
सजी हे नगरी अयोध्या
प्राण प्रतिष्ठा की है तैयारियां 
केसरिया रंग में रंगी ये अयोध्या

सरयू तट पर दीप जलाएँ
हर आंगन में खुशियाँ आए
रघुनंदन आए है
हर घर में श्री राम ज्योत जलाएँ

हिमालय की वादियों से
हिंद सागर की लहरों से
एक ही नारा है
रघुनंदन आए है हमारे
प्रभु श्री राम आए है

©shailesh bade
  jay shree ram...
ram mandir

jay shree ram... ram mandir #मराठीसंस्कृति

8e040715173f88fc6b465f20a933df7e

shailesh bade

दसरा

पान आंब्याचे गुंफले तोरणी
चढला साज कणशीचा आज दारी

फुल झेंडूचे विणले माळी
शोभुन दिसे रांगोळी दारोदारी

शस्त्राना ही आले रूप देवत्वाचे
पूजियेले त्यांसी घरोघरी

आपट्याच्या पानाला मुलामा सोनेरी
वाढवे नात्यांचा गोडवा दारोदारी

सण आज दसरा आनंदाचा नाही तोटा
जागवे माणुसकीचा धर्म घरोघरी

©shailesh bade
  #navratri
8e040715173f88fc6b465f20a933df7e

shailesh bade

मैत्री

जोडले आहेस नाते मैत्रीचे जरा जपून ठेव
चार चौघात टोमणे ऐकण्याची सवय ठेव

नसले नाते जरी रक्ताचे तरी हृदयात ठेव
चार सल्ले ऐकण्याची तयारी ठेव

भेटतील सुखात अनेक थोडे अंतर ठेव
उभे राहतील मित्र दुःखात थोडा विश्वास ठेवा

वाटेल एकटे जेव्हा सोबत आठवणीची ठेव
मिळेल उमेद जगण्याची मनात साठवून ठेव

लावले आहेस झाड मैत्रीचे जिवंत ठेव
लाभेल सावली सदैव थोडा विश्वास ठेवा

येतील वादळे अनेक मातीत जखडून ठेव
राहील अभेद्य मैत्री जरा जपून ठेव

©shailesh bade Marathi Kavita
8e040715173f88fc6b465f20a933df7e

shailesh bade

नभ दाटून आले 
मोसमी वारे वाहिले
वसंताचे पान सरले 
मेघ ऋतु चे आगमन  झाले 

रिमझिम सरीत भिजले
अंगणी मोर नाचु लागले
चातकाचे प्राण सुखावले
मेघ ऋतु चे आगमन झाले 

थेंबा थेंबातुन भिजले
गंध मातीचे दरवळून गेले
इंद्रधनू नभात दाटले
मेघ ऋतु चे आगमन झाले 

बीज अंकुर पेरले
ओल्या मातीच्या कुशीत रुजले
हिरव्या शालूत सजले
मेघ ऋतु चे आगमन झाले

©shailesh bade Marathi Kavita
8e040715173f88fc6b465f20a933df7e

shailesh bade

मैत्री असावी सुंदर पाण्याहून निर्मळ
मैत्री असावी मायळ चंद्राहून शीतल

मैत्री असावी मधुर अमृताहुनी गोड
मैत्री असावी अतूट नात्याहुन प्रेमळ

मैत्री असावी अथांग सागराहुन खोल
मैत्री असावी अनंत आकाशगंगेहुन विशाळ

मैत्री असावी दीप पणतीतल्या ज्योतीवानी
मैत्री असावी तेजस्वी सूर्य किरणावानी

मैत्री असावी सुगंधी कस्तुरीचा गंधावानी
मौत्री असावी सोनेरी परिसाच्या रूपावानी

मैत्री असावी प्रेमळ मायेच्या ममतेवानी
मैत्री असावी निस्वार्थी कृष्ण सुदामावानी

©shailesh bade #nightsky
8e040715173f88fc6b465f20a933df7e

shailesh bade

बावरे मन

मन माझे फुलपाखरू झाले
रंगबिरंगी स्वप्ने पाहू लागले
भिरभिरणाऱ्या वाऱ्यासंग वाहू लागले
मन माझे बावरे झाले 

                                 हिरवे हिरवे रान बहरले
                                      कोवळ्या उन्हात नाहले.    
                                 कोकिळेच्या मधुर सूरात रंगले
                                  मन माझे बावरे  झाले 
थेंबाथेंबातुन भिजले.                           
गंध प्रितीचे दरवळून गले.                          
प्रेम क्षितिजावरती.                       
मन माझे बावरे झाले                        
                                   रिमझिम सरीत भिजले
                                  स्पर्शाचे ही शहारे झाले
                                  हाता मध्ये हात तुझे
                                   मन माझे बावरे झाले
नजरेतले इशारे असे.                      
प्रेमात फसने झाले.                    
प्रीतीच्या झुल्यात झुलले.                   
मन माझे बावरे झाले                    
                                   कळीतले फूल उमलले
                                  नात्यात बहरणे झाले
                                आठवणींच्या  हिंदोळ्यावरती
                                  मन माझे बावरे  झाले

Shailesh Bade,,🖋️🖋️

©shailesh bade Marathi kavita bavare man

Marathi kavita bavare man #Poetry

8e040715173f88fc6b465f20a933df7e

shailesh bade




तिरंगा

आन बान शान हो तुम
इस देश की पहचान हो
तीन रंगों से सजा सरताज हो 

स्वाभिमान हो तुम
इस देश का अभिमान हो
तीन रंगों से चमकता सितारा हो 

शांति का प्रतीक हो तुम
इस देश का आत्मा हो
तीन रंगों से भरा जुणून हो 

एकता की मिसाल हो तुम
इस देश की धड़कन हो
जान से भी प्यारा तिरंगा हो 

सलामत रहे सदा लहराता रहे
गूंजता नाम तिरंगा ऊँचा रहे
झेंडा हमारा सदा ऊँचा रहे

©shailesh bade
  tiranga marathi kavita

tiranga marathi kavita #मराठीशायरी

8e040715173f88fc6b465f20a933df7e

shailesh bade

राधे राधे  













नामकरण विधी समारंभ
कृपया आमच्या लाडक्या मुलीचे नाव ठेवण्यासाठी
आणि आमच्या मुलीच्या मंगळ जीवनासाठी आशीर्वाद देण्यासाठी
रविवारी आयोजित केलेल्या उत्सवांमध्ये सामील व्हा. 

  ठिकाण - वाकस
  तारीख -12/06/2022
   वेळ - दुपारी 2 वाजता
   निमंत्रक -  शैलेश बदे

©shailesh bade #Krishna
8e040715173f88fc6b465f20a933df7e

shailesh bade

|| दिवाळी ||

लागले दिवे दारी
उजळल्या ज्योती 
रंगात रंगली रांगोळी अंगणी
आली दिवाळी ही घरोघरी 
सजले स्वयंपाक घर                                     
गृहिणीच्या हाती रेसिपी                                      
फराळाची ही मेजवानी                                      
आली दिवाळी ही घरोघरी                                       
                      लागला पहिला दिवा दारी
                    ओवाळी बळीराजा गाई पाडसासी
                    आंनदाची अन उत्सवाची
                     आली दिवाळी ही घरोघरी
रोषणाईत सजली नगरी                                   
लक्ष्मीची पाऊले आली दारी                                  
नव चैतन्य घेऊन                                  
आली दिवाळी ही घरोघरी                                    
                      अभ्यंग स्नानाची पहाट ही सजली
                   सुगंधी उटण्यात नाहली
                      फटाक्यांच्या आतषबाजीत रंगली
                      आली दिवाळी ही घरोघरी 
उत्सव नात्यांचा रंगला दारी                                 
ओवाळी बहिन भावासी                                 
हर्ष उल्हासाची                               
आली दिवाळी ही घरोघरी                 शैलेश बदे...✍️✍️

©shailesh bade दिवाळी

#Diwali
loader
Home
Explore
Events
Notification
Profile