Nojoto: Largest Storytelling Platform

गोकुळी आजी आनंद झाला, नंदाच्या घरी बाळ जन्मला, काय

गोकुळी आजी आनंद झाला, नंदाच्या घरी बाळ जन्मला,
काय सांगू त्याच्या बाळ लीला ग, जो बाळा जो जो रे जो ।।धृ।।

नंदाचा हा नंदलाला, काळा सावळा, नाजूक नि भोळा,
म्हणुनी आवडे गोप-गोपाळा, जो बाळा जो जो रे जो ।।१।।

देवकीपोटी अवतार झाला, कंसाला चुकवून गोकुळी आला,
उसळलेला पूर शांत हो केला, जो बाळा जो जो रे जो ।।२।।

मातेस मुखी विश्व दाविले, कालियास याने सहज हरवले,
गोवर्धनही करांगुळी उचलीला, जो बाळा जो जो रे जो ।।३।।

पांडवांचा हा स्वामी झाला, कंसाचा याने वध हो केला,
मथुरेत याचा आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो ।।४।।

सारे गोकुळ याने भुलविले, ब्रह्मांडी एक कृष्णरुप दाविले,
आमच्या ठायी ठायी मुराला, जो बाळा जो जो रे जो ।।५।।

अवर्णनीय हा बारसा सोहळा, बाळ गणेश आनंदित झाला,
कृष्ण चरणी माथा टेकीला, जो बाळा जो जो रे जो ।।६।। #कृष्ण #पाळणा #कृष्णजन्माष्टमी #yq_gns