अलवार ओठांवर उमटते गोड हास्य आठवते जेव्हा तुझ्या माझ्या प्रेमाची ती धुकेदार सांज.. त्या सांजेच्या आकाशी,केशरी रंगाची उधळण होती. बेधुंद करणाऱ्या वाऱ्यात,तुझी साथ होती. इवल्याशा रानफुलांना हि,धुंद नशा चढली होती. मंद धुंद गारव्यात,तुझ्या हाती गुंफला हात. आठवते जेव्हा तुझ्या माझ्या प्रेमाची ती धुकेदार सांज. तुझ्या मिठीतली ती रात्र सख्या, स्वर्गच गवसला होता. तुझ्या स्पर्शाने त्या रातीला,रातराणीचा सुगंध दरवळला होता. कधीच नको विरह,अशीच सुप्त भावना दोघांत. आठवते जेव्हा तुझ्या माझ्या प्रेमाची ती धुकेदार सांज.. येडू ©Sujata Chavan #youNme# #MySun