Nojoto: Largest Storytelling Platform

वृत्त:- पादाकुलक ८ ८ शीर्षक:- जीवन अवघे कृतार्थ व

वृत्त:- पादाकुलक
८ ८

शीर्षक:- जीवन अवघे कृतार्थ व्हावे

धरा नभाच्या अंतरातले 
बंध मनाचे मना कळावे
मिलनासाठी अधीर होता
जीवन अवघे कृतार्थ व्हावे

चंचल वारा भिरभिरताना
ओठामधुनी गीत स्फुरावे
धुंद सरीच्या तालावरती
तनामनाने चिंब भिजावे

रमून जावे प्रभातकाली
वसुंधरेच्या रुपात प्रांजळ
कुरणावरती चमचमणाऱ्या
दव मोत्यांची सजते ओंजळ

वसुंधरेचा थाट पाहण्या
जाउन यावे क्षितिजापाशी
असेच निर्मळ जीवन दे तू
हेच मागणे प्रभुुरायाशी.!

©Sarita Prashant Gokhale #Mountains
वृत्त:- पादाकुलक
८ ८

शीर्षक:- जीवन अवघे कृतार्थ व्हावे

धरा नभाच्या अंतरातले 
बंध मनाचे मना कळावे
मिलनासाठी अधीर होता
जीवन अवघे कृतार्थ व्हावे

चंचल वारा भिरभिरताना
ओठामधुनी गीत स्फुरावे
धुंद सरीच्या तालावरती
तनामनाने चिंब भिजावे

रमून जावे प्रभातकाली
वसुंधरेच्या रुपात प्रांजळ
कुरणावरती चमचमणाऱ्या
दव मोत्यांची सजते ओंजळ

वसुंधरेचा थाट पाहण्या
जाउन यावे क्षितिजापाशी
असेच निर्मळ जीवन दे तू
हेच मागणे प्रभुुरायाशी.!

©Sarita Prashant Gokhale #Mountains