Nojoto: Largest Storytelling Platform
smitadhonsale3093
  • 158Stories
  • 116Followers
  • 1.5KLove
    1.3KViews

Sarita Prashant Gokhale

House wife

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा 
डोळ्यांच्या काठात येतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
प्रेमाच्या रंगात भिजवतो...

हृदय घायाळ होऊन जेव्हा 
वेदनेच्या मर्माला तीर लागतो
तेव्हा मनातला कृष्ण मला
कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो....

चांदणे हास्यात लपवून
नयनांची पौर्णिमा झाकतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
संसाराच्या अंगणात आठवतो....

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale #WoRasta 
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

#WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... #मराठीकविता

11 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

वृत्त:- स्त्रग्विणी

लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा

सौख्य ताटातले घेतले मी कुठे
दु:ख दैवातले टाळले मी कुठे

सत्व पाहू नको जीवना तू पुन्हा
सांग माझे मला शोधले मी कुठे

प्राण हरलास तू होउनी पारधी
पिंजऱ्याला तुझ्या सोडले मी कुठे

दूर जाऊ नको बोलताना मला
वेदनांना तुझ्या ऐकले मी कुठे

काय सलते मनी सांग तू एकदा
दु:ख सारे तुझे वाचले मी कुठे

सरिता प्रशांत गोखले

©Sarita Prashant Gokhale
  #SunSet 
वृत्त:- स्त्रग्विणी

लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा

सौख्य ताटातले घेतले मी कुठे
दु:ख दैवातले टाळले मी कुठे

#SunSet वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे #मराठीशायरी

76 Views

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

*शीर्षक -- निसर्ग किमया*

हे निळे सावळे डोंगर ती हिरवाईची मखमल
अन् सप्तसुरांच्या संगे ती सरिता वाहे चंचल
धारेने धुंद सरींच्या ही धरणी सुंदर दिसते 
झाडांच्या देहावरती वेलींचे तोरण सजते

मेघांची होता दाटी आकाशी वारा फिरतो
पाहून विजांचे नर्तन पाऊस रुपेरी सजतो
या थेंबांच्या स्पर्शाने सृष्टीस शहारा भरतो 
अन् डोंगरमाथ्यावरुनी हा निर्झर अविरत झरतो

हा गंध मृदेचा सुटता मोहरून जाते काया 
येतो वाऱ्याच्या हाती जणु अत्तरगंधित फाया
गवताचे हिरवे पाते धरतीच्या ओटी सजते
अन् फुल तृणातील इवले प्रेमाला गंधित करते

शुभ्रसे धुके पानांवर दव मोत्यांना  अंथरते
अन् बाग फुलांनी सजता ही अवनी चमकुन दिसते
कोसळणाऱ्या धारेने ही प्रसन्न सृष्टी सारी
तू ठेव अशीच विधात्या ही निसर्ग किमया न्यारी

©Sarita Prashant Gokhale
  #MorningTea
baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

लेक एक भाग्यवंत  
बाबा तिचे भाग्यवंत   ||१||

माझे बाबा माझे गुरू
पिता नामे काव्य सुरू ||२||

स्वप्न माझे साकारले
पित्यामुळे उध्दरले      ||३||

बाबा देव दिसे भारी
वास देवीच्या नगरी    ||४||

रातंदिन राबे हात
तुळजाई देई साथ      ||५||

भाग्य बाबांचे आधी
सेवा मंचकीची साधी  ||६||

संस्कार देती महान 
आम्ही लेकरे लहान    ||७||

यश लाभे कष्टताना
पितृछाया असताना    ||८||

असे बाबा कल्पतरू
आज एक काव्य करू ||९||

लाभो आयू यशवंत
ते अच्युत भाग्यवंत    ||१०||

स्मिता लिहिते अभंग
प्रेम बाबांचे अथांग     ||११||

सरिता प्रशांत गोखले

©Sarita Prashant Gokhale #Gurupurnima
baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale



गुरू परमात्मा l ज्ञानाचे भांडार l
स्मृतींचा आधार l गुरूराव ll

आशिर्वाद देती  l  गुरू पदोपदी l
वाढे ज्ञानवेदी l सकलांची ll

गुरूंची विभुती l अज्ञान जाणती l
ज्ञानात नेणती l सत्य वाणी ll

जड मूढ तारी  l गुरू ज्ञानगंगा l
जावे कुठे सांगा l गुरूविन ll

करण्या विस्तार l दैवी मनोगत l
नित्य पूजनात l गुरू ठेवा ll

सिध्दी सकळांना l दावी जन्मफळा l
गुरूंचा सोहळा l रोज करा ll

आई बाप आधी l पहिलेवहिले l
संस्कारी वाहिले l  हृदयात ll

जन सारे मज l देती थोर ज्ञान l
लहान महान l सारे गुरू ll

नमस्कार माझा l या ज्ञानसागरा l
दिला ज्ञानवारा l माझ्या हाती ll

गुरू अक्षरात l दोष सारे जळी l
अज्ञान सगळी l विनाश ती ll

दोन अक्षरात l गुरू मज तारी l
अखंडित वारी l घडो सदा ll

©Sarita Prashant Gokhale
  #Gurupurnima
baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस
नाचे मोर रानामध्ये,
पिसे गळताना दाटे
रडू सारे मनामध्ये.! 

येता पहिला पाऊस
होतो शेतकरी बाप,
देतो जगाला आधार
दिसे घामाचा प्रताप.!

येता पहिला पाऊस
वारा भरे दान असं
रानी वनी हिरवळ 
तेव्हा ओठी भरे हसं.!

©Sarita Prashant Gokhale शीर्षक:- पहिला पाऊस

येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस

शीर्षक:- पहिला पाऊस येता पहिला पाऊस देतो मनाला गारवा, सृष्टी सजताना सारी शालू नेसते हिरवा.! येता पहिला पाऊस #मराठीकविता

12 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले 
संकटात पामरास का असेच टाकले 
का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले
तू मलाच सांग आज साकड्यात टाकले

एक नाम अंतरात मी सदैव जोडले
मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले
दर्शनात मी समोर एक रूप  पाहिले 
जीवनात मायबाप विठ्ठलास मानले

सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो
पुण्यवान लेकरास आसपास वाटतो
साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो
पंढरीत एक देव या जगास तारतो

©Sarita Prashant Gokhale देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले

देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले देवराज विठ्ठलास एकदा विचारले #मराठीकविता

15 Love

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale



गुंतून मी कधीही पडले कशात नाही 
सोडून दुःख माझे मी बंधनात नाही

माझी पवित्र काया झिजवून तूच घेशी
देवा तुझ्या प्रमाणे मी मंदिरात नाही

जाणून घे जरासे तू दुःख पामरांचे
मोक्षास तोच जातो नरकात जात नाही 

आली पुन्हा नव्याने बघ रांग संकटाची
घे उचलुनी कडेवर,ती पाळण्यात नाही

विसरू नकोस दु:खा आहे तुझीच सरिता
रडवू नको स्मिताला ती सागरात नाही

©Sarita Prashant Gokhale
  आनंदकंद

गागालगा लगागा गागालगा लगागा

गुंतून मी कधीही पडले कशात नाही 
सोडून दुःख माझे मी बंधनात नाही

माझी पवित्र काया झिजवून तूच घेशी

आनंदकंद गागालगा लगागा गागालगा लगागा गुंतून मी कधीही पडले कशात नाही सोडून दुःख माझे मी बंधनात नाही माझी पवित्र काया झिजवून तूच घेशी #मराठीशायरी

149 Views

baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

वृत्त:- पादाकुलक
८ ८

शीर्षक:- जीवन अवघे कृतार्थ व्हावे

धरा नभाच्या अंतरातले 
बंध मनाचे मना कळावे
मिलनासाठी अधीर होता
जीवन अवघे कृतार्थ व्हावे

चंचल वारा भिरभिरताना
ओठामधुनी गीत स्फुरावे
धुंद सरीच्या तालावरती
तनामनाने चिंब भिजावे

रमून जावे प्रभातकाली
वसुंधरेच्या रुपात प्रांजळ
कुरणावरती चमचमणाऱ्या
दव मोत्यांची सजते ओंजळ

वसुंधरेचा थाट पाहण्या
जाउन यावे क्षितिजापाशी
असेच निर्मळ जीवन दे तू
हेच मागणे प्रभुुरायाशी.!

©Sarita Prashant Gokhale #Mountains
baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

मन घालतेय पिंगा
दिस ढळता ढळेना,
चुके अंतराचा ठोका
काय झालया कळेना..

रानी पाखरांचा थवा
कुणा हाकरतो आहे,
हाक कानावर आली   
झुला बोलावतो आहे..

चल चल गाडीवाना
गाडी हाक लवकर,
येऊ जाऊन माघारी 
माझ्या घरी क्षणभर..

जरा धुसर धुसर
दिसे नागमोडी घाट,
तिथे डोंगरा पल्याड
माझ्या माहेराची वाट..

~सरिता गोखले

©Sarita Prashant Gokhale #Sunrise
loader
Home
Explore
Events
Notification
Profile