Nojoto: Largest Storytelling Platform

उष:काल झाला, नवा काळ आला, नवी चंद्र-माला,

उष:काल झाला,
नवा काळ आला,
नवी चंद्र-माला,
           वीणली.. तुझ्या पावलांनी..
नवे स्वप्न लोचनी,
नवे हास्य वदनी,
नवा प्राण वचनी,
            आला.. तुझ्या पावलांनी..
मनाचा मनाशी नवा हा भास, 
तुज पासून तुजपाशी माझा प्रवास,
घे व्यापुन माझ्या क्षितिजाचा व्यास, 
            सगळा.. तुझ्या पावलांनी..
नवे स्मीत ओठी,
हृदयाच्या काठी,
नवा ऐक थांबा वैकुंठी,
            बनला.. तुझ्या पावलांनी..
ईश्वराशी नसे मागणे थेट,
तुज घेताच कडेत,
मला माझीच भेट,
            घडली.. तुझ्या पावलांनी..

©FalgunWords माझ्या चिमुकल्या "कोषाग्री" साठी..
for my lil princess daughter "KOSHAGREE"
#daughter
उष:काल झाला,
नवा काळ आला,
नवी चंद्र-माला,
           वीणली.. तुझ्या पावलांनी..
नवे स्वप्न लोचनी,
नवे हास्य वदनी,
नवा प्राण वचनी,
            आला.. तुझ्या पावलांनी..
मनाचा मनाशी नवा हा भास, 
तुज पासून तुजपाशी माझा प्रवास,
घे व्यापुन माझ्या क्षितिजाचा व्यास, 
            सगळा.. तुझ्या पावलांनी..
नवे स्मीत ओठी,
हृदयाच्या काठी,
नवा ऐक थांबा वैकुंठी,
            बनला.. तुझ्या पावलांनी..
ईश्वराशी नसे मागणे थेट,
तुज घेताच कडेत,
मला माझीच भेट,
            घडली.. तुझ्या पावलांनी..

©FalgunWords माझ्या चिमुकल्या "कोषाग्री" साठी..
for my lil princess daughter "KOSHAGREE"
#daughter
falgun1657793589602

FalgunWords

New Creator

माझ्या चिमुकल्या "कोषाग्री" साठी.. for my lil princess daughter "KOSHAGREE" #daughter #मराठीकविता