आल्या वळीवाच्या सरी माती न्हाती धुती झाली बीजं रुजलं काळजात सांज शहारून आली भेगाळल्या जीवा असं शिंपण सुखाचं माळ शिवारात फुलं आता सपान मोत्याचं वणव्यात वैशाखाच्या सुखं करपून गेलं करणी त्या परमेशाची डोळं नभाचं पाणावलं ठाई ठाई पांढरीत मेघराशी बरसल्या सुपाएवढं काळीज बळीराजा हरखला फुट मनाला अंकुर हात जोडी धरतीला सुखं पेरलं मातीत सारा भार देवा तुला ओटी भरली ओंजळ पिकं येवो मायंदळ सोन्या मोत्याची ही रास आता भरू दे हे खळ ©Shankar kamble #पाऊस #पाऊसधारा #शेतकरी #पेरणी #शेती #वळीवाचापाऊस #धारा #पाणी_पाऊस_देगा_देवा