Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यात दाटुनी भावना सारे मलाच पाहत होते किती तरी

डोळ्यात दाटुनी भावना सारे मलाच पाहत होते किती तरी ओळखी अनोळखी चेहरे आज त्यात होते. कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहून गेलं मरता मरता सहज कळालं जगण आपलं राहून गेलं . .आयुष्यात नागमोडी वळणांना खुपदा पाहिलं होतं जे क्षण होते सुटलेले त्यांना जगायचं राहून गेलं. एका क्षणात डोळ्यासमोरून जीवन सगळं धावून गेल .मरता 2घरच्यांची स्वप्न सारी एकदम कशी चुर झाली रडताना म्हणालं कोणी नियती कशी क्रुर झाली . माझ त्यांच्यातुन जाण घरच्यांना घोर लाऊन गेल मरता २. .लोकांतला खोटा मान सन्मान यांना मी माझ म्हणालो जीवनभर अपेक्षांचे ओझेचं फक्त वाहत राहिलो. शेवटी खांदे बदलत बदलत लोकांनी माझं प्रेत स्मशानी वाहुन नेलं जळता जळता परत कळालं साला आपलं जगणंचं राहुन गेलं. जगणं आपलं राहुन गेलं

shrubhore0335

Shru-Bhore

New Creator