Nojoto: Largest Storytelling Platform

मुके काळीज मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही

मुके काळीज 

मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही,
झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही.

कितीतरी वर्षे निघुनी गेली, पण अजुनी बोल फुटला नाही,
सहन केले विस्तवाचे चटके, पण अजून तोंड उघडले नाही
 सोसले घाव मुकाट्याने, अजुनी एकदाही रडणे नाही 
चाबकाचे फटके कित्येक, पण कोणतीच जुवारी नाही

अजुनी पाहतात वाट नेत्र , चातकाची पुन्हा भेट नाही,
शोधतो आहे हा मृग, पण  किंचितसेही जल नाही,
व्याकूळ आहेत ओठ माझे, पण थोडीशीही माया नाही
खेळलो खेळ माकडांचे, पण कधीच कोणता मदारी नाही 

शेवटच्या घटका मोजतोय, पण भावनेची बेइमानी नाही 
सर्व वैद्य थकले आता, त्याला कोणता उपचार नाही 
सरणावरी ठेऊनी सज्ज, त्याला कोणतीच वाचा नाही
जळतो आहे धुमसत धुरक्यानी, आता दूसरी यारी नाही

©केशव मुके काळीज

keshavpatilwasri6715

Keshav

New Creator