Nojoto: Largest Storytelling Platform

White #मायबोली मराठी.... शब्दवेडा किशोर माझी मायब

White #मायबोली मराठी....
शब्दवेडा किशोर 
माझी मायबोली भाषा मराठी लाविते मनास अभिलाषा मराठी 
संवाद साधता होत नसे निराशा ती असे माझ्या महाराष्ट्राची शान मराठी 
असे आम्हांस सदैव अभिमान तिचा दुर सर्व देशी होई सन्मान
अशी ती महान माझी राजभाषा भाषा मराठी
मला असते तिची आस अन् आहे तिच माझी सुखाची रास व माझ्या जगण्याचा विश्वास माझी मायबोली मराठी 
काना मात्रा वेलांटी आकार ऊकार रस्व व दिर्घ विराम स्वल्पविराम
पुर्णविराम उदगारवाचक अशा अनेक चिंन्हानी बहरलेली खुललेली माझी मायबोली मराठी
खरंच..जरी मावशी म्हणून स्वतःस जगी मिरविते
इंग्रजी भाषा माझ्या मायबोलीची
तरी शपथ तुम्हाला आहे सात समुद्रापल्याडदेखील
सन्माननिय वंदनीय अशी माझी लाडकी मराठी भाषा आहे 
धन्य झाले प्राक्तन माझे झाली माझी मायमाऊली मराठी
गर्व वाटतो सदा मलाच माझा बोलतो मी माझी मायबोली मराठी
माझे बोल माझे शब्द माझे गीत माझे बालकडू मराठी
माझे शिक्षण माझे मनन माझे वतन माझे आत्मचिंतन माझे राष्ट्र मराठी
माझी शांतता माझा विद्रोह माझं व्यक्तपण माझं कर्तेपण मराठी
माझं तत्व माझं सत्व माझी मायबोली मराठी
अजि म्या धन्य जाहलो जन्माने घेतले मी स्वरूप मराठी
जाहला माझा देह पावन दास जिचा जाहलो जन्माने मी
अशी अगाध लीला जिची ती सर्वसुवर्णसंपन्न
भाषा माझी मायबोली मराठी

©शब्दवेडा किशोर #माझीलेखणी