Nojoto: Largest Storytelling Platform

White #पुन्हा एकदा जन्म घे केशवा तू.... शब्दवेडा क

White #पुन्हा एकदा जन्म घे केशवा तू....
शब्दवेडा किशोर
रक्षक नाही कुणी राहिला आता 
राक्षस बनला येथे जीवनदाता
मरणयातना तिला किती रे दिधल्या 
इतक्या कैशा तुझ्या भावना थिजल्या
डॉक्टरला तर देव समजती सारे 
हैवान कसा त्या देवाचा झाला रे
भूक कशी ना शरिराची तव शमली
विरोध करून अखेर ती दमली रे 
शेवटचा मग घेतला तिने श्वास 
कसा कुणावर ठेवावा विश्वास
अंतिम समयी विचार तिज हा आला 
काळ कसा हा घात करूनी गेला 
दु:शासन का इथले संपत नाही 
आजच्या युगाच्या पांचालीला न्याय
लवकर मिळत का बरं नाही 
पुन्हा एकदा जन्म केशवा घे तू
पांचांलीचे दुःख हराया ये तू

©शब्दवेडा किशोर #देव_माझा
White #पुन्हा एकदा जन्म घे केशवा तू....
शब्दवेडा किशोर
रक्षक नाही कुणी राहिला आता 
राक्षस बनला येथे जीवनदाता
मरणयातना तिला किती रे दिधल्या 
इतक्या कैशा तुझ्या भावना थिजल्या
डॉक्टरला तर देव समजती सारे 
हैवान कसा त्या देवाचा झाला रे
भूक कशी ना शरिराची तव शमली
विरोध करून अखेर ती दमली रे 
शेवटचा मग घेतला तिने श्वास 
कसा कुणावर ठेवावा विश्वास
अंतिम समयी विचार तिज हा आला 
काळ कसा हा घात करूनी गेला 
दु:शासन का इथले संपत नाही 
आजच्या युगाच्या पांचालीला न्याय
लवकर मिळत का बरं नाही 
पुन्हा एकदा जन्म केशवा घे तू
पांचांलीचे दुःख हराया ये तू

©शब्दवेडा किशोर #देव_माझा