ठरवायचे आहे तुला येथून कोठे जायचे येथेच घुटमळलास तर निसटून रस्ते जायचे इतरत्र पोहचलास तर मग तू तुझे पाहून घे रात्री नव्या मुलुखात नसते एकट्याने जायचे माहीत नाही का इथे थांबा करावा लागला येथून गेले तर अगोदर फक्त भटके जायचे समजायचे मग शेवटी नाही कुणाचा कोणता मिसळून सगळे येथले शहरात रस्ते जायचे आला कुठे अजुनी तुझ्या माझ्यामधे परमोच्च क्षण उपभोग - उपभोक्त्यातले भिन्नत्व आहे जायचे आता जरी म्हणतेस की गतकाळ ब्रह्मार्पण करू पण प्रश्न उरतो की कसे सोडून नाते जायचे माझ्या प्रवासाचा करू नाथा कसा अनुभव कथन कोठेच नाही पोचलो सर्वत्र होते जायचे एकनाथ ©Eknath Dhanke #CityWinter