Nojoto: Largest Storytelling Platform
eknathdhanke2131
  • 59Stories
  • 11Followers
  • 631Love
    237Views

Eknath Dhanke

  • Popular
  • Latest
  • Video
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White एक थरथरते शिडी अन् वेगळा पडतो असर
कोण ढासळतो, कुणाची मात्र गच्चीवर नजर

आजही सगळे सुरू आहे जसे होते तसे
राहिल्या ना फक्त पहिल्या सारख्या इच्छा जबर

व्हायचे तादात्म्य इतके की मिटावी नग्नता 
शेवटी होवोत अपुले देह उघडे फार तर

कोणत्या निद्रेत दुनिये पहुडली आहेस तू 
काय ह्याचे मी करू, कोणास देऊ हा बहर

शेवटी आलीच बागेवर नको ती आपदा
फुल बहरले नेमके अन् आंधळा झाला भ्रमर

याहुनी काहीच नाथा वेगळे नाही पुढे
तेच ते आता नव्याने उलगडत जातील थर
.
.
(काय वर्णावी घराने  ह्या कलेची थोरवी
लावला आहे चुना पण वाटतो संगमरवर )

एकनाथ

©Eknath Dhanke #alone_quotes
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White आत्ताच नका टाकू माझ्या गळ्यात माला 
अजून माझा शेवटचा टवका न उडाला 

कोणी म्हणतो आले तर येऊ द्या खाली
कोणी म्हणतो टेकू लावा आकाशाला 

एकनाथ

©Eknath Dhanke #Emotional_Shayari
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White एकेका योद्ध्याची जागा खाली करतो आहे
मी ही कुठल्या युद्धाची तय्यारी करतो आहे

लढतो लढतो म्हणता म्हणता पळून गेला राजा
प्यादा आता विजयाची चाचपणी करतो आहे 

यामुळे तरी संपतील का माझ्या साऱ्या इच्छा 
मी रोज नव्या उपभोगांची तृप्ती करतो आहे

युगायुगांच्या भटकंतीने थकला आहे बहुधा
माझा आत्मा नुसता शांती शांती करतो आहे

अज्ञाताच्या अंशाचे  होईल ज्यातुनी दर्शन
त्या मूर्तीसाठी ही फोडाफोडी करतो आहे

हात चलाखीला भुलते आहे दुनिया नाथा अन् 
चमत्कार दाखविण्याच्या तू गोष्टी करतो आहे 

एकनाथ

©Eknath Dhanke #Romantic
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White ह्या खडतर पण अद्भुत स्वप्नाचा प्रवास आहे हा 
क्षितिजाला चिमटीत पकडण्याचा प्रवास आहे हा 

असेच आधी अवतीभवती धूसर धूसर दिसते
हळू हळू रस्ता प्रकाशण्याचा प्रवास आहे हा

एक संपतो तर लगेच पुढचा खुणावतो रस्ता
रस्त्याने रस्ता उलगडण्याचा प्रवास आहे हा

माझी सोबत जी काही होती ती इथवर होती
इथून पुढचा तुझ्या एकट्याचा प्रवास आहे हा 

कसे पोहचू कधी पोहचू माहित नाही नाथा
अनवट वाटांवर अज्ञाताचा प्रवास आहे हा 

(नंतर पुढचे आणि मागचे काहीच दिसत नाही
ठायी ठायी वळणा वळणाचा प्रवास आहे हा)

एकनाथ

©Eknath Dhanke #Night
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

Beautiful Moon Night तुला वाटले की अंगावर आली आहे
सरळ चालते ती, तुझी नजर तिरकी आहे

तो खुश आहे, जो लाटांवर स्वारी करतो
तो घाबरतो, ज्याची नौका फुटकी आहे

अशा तऱ्हेने दुःखांना वागवले मी की
आता दुःखांनीच घेतली धास्ती आहे

दबकत दबकत हळूच घुसतो येथे आम्ही
तुझे काय बाबा, तुझी इथे चलती आहे..

प्रत्येकाला सावरायला पाहतोस तू
तुला वाटते की सगळ्यांना चढली आहे

तुझ्या जवळ येतोय जरी टप्प्या टप्प्याने 
भेट आपली होणारच जी ठरली आहे

तो सध्या डोळे वटारतो आहे नुसता
काळाचे धमकावणे अजुन बाकी आहे

त्याच्याही पायावर माथा टेकवा कुणी
त्याने तर अनवाणी वारी केली आहे 

एकनाथ

©Eknath Dhanke #beautifulmoon
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White सोडू शकतो शंकर त्याच्या सगळ्या चिंता कधीतरी 
विष पचवावे लागणार आहे दुनियेला कधीतरी

उंच एवढी उगाच का झालीत दऱ्यांनो शिखरे ही
खोदून तुम्ही दिली असावी माती यांना कधीतरी

पाहून तुला ज्यांच्या नजरेचे सार्थक नाही झाले
होणार घोर पस्तावा त्यांच्या डोळ्यांना कधीतरी

नंतर नंतर तिथे आपला श्वास नेमका गुदमरतो
जिथे सोडतो आपण सुटकेचा सुस्कारा कधीतरी

ह्या आशेने मी दुनियेच्या  दुःखावर कविता करतो
दुनियाही माझ्या दुःखावर करेल कविता कधीतरी

शक्यच नाही माझे तेथे स्वतःहून पोचणे कधी
तूच मला सोबत ने गाभाऱ्यात विठोबा कधीतरी

पुन्हापुन्हा ह्या विश्वासावर फिरतोय मुलुख जन्मांचा 
लांघणार देहाच्या सीमा माझा आत्मा कधीतरी

एकनाथ

©Eknath Dhanke #nightthoughts
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

कोणती अशी ही
कसोटीची रीत
संकल्प मिठीत
आटवले

एवढ्याने मात्र
एक झाली गोची
शरीरावरची
इच्छा मेली

बरी झाली आत्म्या
जन्माची भ्रमंती
झाल्या भेटीगाठी 
आप्तेष्टांच्या 

ज्याच्यातून इथे
निसटाया आलो 
त्यातच पावलो
अंतर्धान 

एकनाथ

©Eknath Dhanke #traintrack
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

उघडा उघडा
मोहाचे कोठार
कैवल्याचा भार
पेलवेना

खुणावतो देह
बावरतो जीव
आत्म्याची कणव
येते पुन्हा

आता कशाला मी
करू जप तप 
तुझे एक रूप
आठवेना

लागलाच नाही
शोध अज्ञाताचा
पत्ताही स्वतःचा
विसरलो

आपल्याच साठी
झुरायचे मग
आपलेच जग
येता जाता
.
.
.

©Eknath Dhanke #traintrack
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

एकच असू शकते गुपित जागेपणाचे 
झाले न अजुनी स्वप्न इथल्या वास्तवाचे

लाजळुच्या पाना सहन कर स्पर्श थोडा
चल आज मिटवू दे तुझे भय जंगलाचे

तू आज ज्या ह्या मारतो आहेस डुबक्या
बक्षीस आहे का तळे सांभाळण्याचे?

राबायला ये सोहळा समजून घरचा  
रुसणे बरे नाही जवळच्या माणसाचे

इतकेच आयुष्यामधे कर्तृत्व माझे
मी जॉब केला, फेडले हफ्ते घराचे

दुनियाच झाली एवढी रंगीन ही की
दुःखच निरर्थक वाटते डागाळल्याचे 
.
.
.
.
जीवंत तात्पुरती पुन्हा झालीत नाती
कारण पुन्हा ठरले मरण नात्यातल्याचे

जावे कुठे मग गावकडच्या कावळ्याने
चिमणीस जर अप्रूप शहरी कबुतराचे

एकनाथ

©Eknath Dhanke #Anger
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

उघडा उघडा
मोहाचे कोठार
कैवल्याचा भार
पेलवेना

खुणावतो देह
बावरतो जीव
आत्म्याची कणव
येते पुन्हा

आता कशाला मी
करू जप तप 
तुझे एक रूप
आठवेना

लागलाच नाही
शोध अज्ञाताचा
पत्ताही स्वतःचा
विसरलो

आपल्याच साठी
झुरायचे मग
आपलेच जग
येता जाता

कोणती अशी ही
कसोटीची रीत
संकल्प मिठीत
आटवले

एवढ्याने मात्र
एक झाली गोची
शरीरावरची
इच्छा मेली

बरी झाली आत्म्या
जन्माची भ्रमंती
झाल्या भेटीगाठी 
आप्तेष्टांच्या 

ज्याच्यातून इथे
निसटाया आलो 
त्यातच पावलो
अंतर्धान 

एकनाथ

©Eknath Dhanke #Preying
loader
Home
Explore
Events
Notification
Profile