Nojoto: Largest Storytelling Platform

आहे जरी मार्ग अंधारात, तरी जिद्द क्षणाक्षणात, कधी

आहे जरी मार्ग अंधारात,
तरी जिद्द क्षणाक्षणात,
कधी असेल आनंद
कधी जिवघेणा झंझावात...

असा प्रवास जिवनाचा,
तुझ्या माझ्या सोबतीचा,
नाही विझणार दिवे,
बनू आधार वातीचा...

सामोरे जाऊन सर्वाला,
येईल तुझ्या संगतीला,
उरलेल्या श्वासांमधे 
करू प्रवास परतीला...

मग सरुन काळोख,
होईल नवी पहाट,
सोबत चल माझ्या,
ओलांडून वादळवाट...

- अंकित

©Ankit Wagh वादळवाट...
आहे जरी मार्ग अंधारात,
तरी जिद्द क्षणाक्षणात,
कधी असेल आनंद
कधी जिवघेणा झंझावात...

असा प्रवास जिवनाचा,
तुझ्या माझ्या सोबतीचा,
नाही विझणार दिवे,
बनू आधार वातीचा...

सामोरे जाऊन सर्वाला,
येईल तुझ्या संगतीला,
उरलेल्या श्वासांमधे 
करू प्रवास परतीला...

मग सरुन काळोख,
होईल नवी पहाट,
सोबत चल माझ्या,
ओलांडून वादळवाट...

- अंकित

©Ankit Wagh वादळवाट...
ankitwagh7044

ankit

New Creator

वादळवाट... #मराठीकविता