Nojoto: Largest Storytelling Platform

किती दिवस अन् काय म्हणुन.. रुढी परंपरेच्या नावाखा

किती दिवस अन् काय म्हणुन..

रुढी परंपरेच्या नावाखाली
भस्माची धुळ मस्तकी फासुन
ज्ञान असुनही अज्ञानागत
एका मेंढरापाठोपाठ एक
कुठवर दगडांपुढे आडवा होणार....?

कुरतडत पानं फुलं अन् गवत
याच निर्जीवापुढे  अंधविश्वासांच्या
पणती सकाळ संध्याकाळ तेवत ठेवणार..?

असंख्य निष्पाप मुक्या जीवांचे
स्वस्वार्थापायी अन् अंधविश्वासात
रक्ताचे पाट अन् कुणाकुणाच्या
दावणी कापल्या जाणार...??

स्वस्वार्थाच्या अन् अंहंकाराच्या 
बाजारात माणुस असुनही माणसं
जात नावाच्या रोगराई पायी
खुन मारामारीच्या रक्तात धुळवड खेळणार....??

©®आयु.एस.टी.धम्मदिक्षित.
काळामवाडी.
९६११२५३४४१.. किती दिवस अन् काय म्हणुन...!!
किती दिवस अन् काय म्हणुन..

रुढी परंपरेच्या नावाखाली
भस्माची धुळ मस्तकी फासुन
ज्ञान असुनही अज्ञानागत
एका मेंढरापाठोपाठ एक
कुठवर दगडांपुढे आडवा होणार....?

कुरतडत पानं फुलं अन् गवत
याच निर्जीवापुढे  अंधविश्वासांच्या
पणती सकाळ संध्याकाळ तेवत ठेवणार..?

असंख्य निष्पाप मुक्या जीवांचे
स्वस्वार्थापायी अन् अंधविश्वासात
रक्ताचे पाट अन् कुणाकुणाच्या
दावणी कापल्या जाणार...??

स्वस्वार्थाच्या अन् अंहंकाराच्या 
बाजारात माणुस असुनही माणसं
जात नावाच्या रोगराई पायी
खुन मारामारीच्या रक्तात धुळवड खेळणार....??

©®आयु.एस.टी.धम्मदिक्षित.
काळामवाडी.
९६११२५३४४१.. किती दिवस अन् काय म्हणुन...!!

किती दिवस अन् काय म्हणुन...!! #poem