भास धुंद रात्र मोगऱ्याचा सुवास तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास तुझे मोकळे केस ती गालावरची बट तुझा मंद श्वास तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास खोल आर्त डोळ नितळ कांती हृदयी माझाच ध्यास तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास नाजूक पाऊल त्यावरचे पैंजण रूप तुझे खास तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास भास तो भास सत्य आहे फक्त आभास मन विचलित करते तूझ्या मिलनाची आस तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास #alone #love #lovepoem #marathi #quotes #love #sad #sadlove #marathiquotes #te #Amruta