Nojoto: Largest Storytelling Platform
amruta2628016810664
  • 18Stories
  • 66Followers
  • 110Love
    47Views

Amruta

Tigress

  • Popular
  • Latest
  • Video
0d6383b7085bea6e7f22659ce71c4a59

Amruta

तू

क्षितिजाकडे डोळे लावून 
तुझी वाट पाहिली 
पण तु आला नाहीस
जाताना पाठमोर्‍या तुला 
आर्त साद दिली 
पण तू ओ दिली नाहीस
प्रेमासाठी झुरले तुझ्या 
पण तुला कधी 
समजलेच नाही #twilight
0d6383b7085bea6e7f22659ce71c4a59

Amruta

चांदनी रात या 
सुनेहेरा हो दिन
बेरंग है ज़िन्दगी का हर 
दिन तेरे बिन
देखो हम जुदा ना 
कभी हो जाये
ओ हमसफ़र,
 दिल के नगर, 
सपने चलो हम सजाएँ
तुम हो साथ 
और 
हम कहीं खो जाएँ

0d6383b7085bea6e7f22659ce71c4a59

Amruta

Alone  मन 

मन मलाही आहे
पण तुला ते कसं कळणार
पाठमोर्‍या माझ्या डोळ्यातले पाणी
तुला कसं दिसणार
नव्हतीच आपली भेट कधी
तरी मन प्रयत्न करणार
पण कपाळाच्या रेषा
अश्या कश्या मिटणार
ओढ घेते मन पुन्हा
आठव ही कशी विसरणार
विचार येतो परत फिरुन
काळ हा कसा सरणार
पण जीवनाच्या या वळणावर
नक्कीच कोणीतरी नवीन भेटणार #marathi #kavita #poem #man #मन
0d6383b7085bea6e7f22659ce71c4a59

Amruta

सखा कृष्ण 

नील अंबरी नील सागरी
सर्वत्र सखा कृष्ण असे
चराचरात चंद्र तार्‍यांत
माझा वनमाळी वसे

रंग सुरांचा गंध फुलांचा
मधु कमळाचा कृष्ण असे
प्रेम ह्रदयीचे ओढ मनाची
आस जीवाची कृष्ण असे #krishna #marathi #kavita #poem #god
0d6383b7085bea6e7f22659ce71c4a59

Amruta

जिथे एका घरात आणि एका कुटुंबातच इतका भेदभाव असेल जिथे मुलगी आणि मुलामधे फरक केला जात असेल तिथे कसला महिला दिन आणि कासल काय..?
एका मुलीच शिक्षण किंवा ती कोणत्या पोस्ट वर आहे अथवा तीला किती आकडी पगार आहे यावरून फक्त तिची योग्यता ठरवता येते का? घरात कष्ट करणाऱ्या घर संभाळणाऱ्या स्त्रीला काही महत्त्व नाही हे वारंवार सिद्ध होत आल आहे. एखाद्या मुलीचे शिक्षण असे काही उल्लेखनीय नसेल किंवा तिचे मोजके शिक्षण झाले असेल तर तिला ती किंमत मिळणे नाही. ती जर काही वेगळे करू पाहत असेल तर ते आम्हाला पटणे नाही.आणि हो ते 
नृत्य, व्यायाम , नाटक , स्वतःचा काही व्यवसाय असेल काही तर आजीबताच नाही. तुम्हीच आखलेल्या चौकटी आणि तुमचेच नियम , तुम्हीच ठरवणार आणि तुम्हीच
 मोडणार तुमचेच खेळ आणि तुमचेच गडी याच नियमावर चाललाय सगळा कारभार मग काय सांगायच आणि काय कोणाला समजायच..घरचेच पाय खेचणार आणि भेद हा असाच चालू राहणार... so वरवर का असेना महिला दिनाच्या शुभेच्या मात्र आपण सगळे social media वर टाकूया...

                                                  -प्राची.

0d6383b7085bea6e7f22659ce71c4a59

Amruta

ती...
तिचे रंग अनेक चित्र एक
तिचे रूप अनेक स्वभाव एक
तिच निभावते तिच दुरावते
तिच रमणी ती या जगाची
जननी बनते
         
 													-अमृता

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

0d6383b7085bea6e7f22659ce71c4a59

Amruta

नातं
मी ऐकलं होतं
नात फक्त रक्तच घट्ट असतं
पण अनुभवल की 
नात हे फक्त प्रेमचं घट्ट असतं
जिथं प्रेम असतं तिथं
अनोळखी ही जिवाभावाचे होतात
आणि प्रेम नसतं तिथं
ओळखीचे परके होतात
																	-दिशा #marathi #lovepoem #love #sadlove #marathiquotes #sad #marathipoetry
0d6383b7085bea6e7f22659ce71c4a59

Amruta

----संपले स्वतःहूनी----
संपली ही काळजी 
संपली ओढ ही 
संपले तुझ्यासही
संपले स्वतःहूनी ।।धृ।। 
आस आता न उरली 
पाउले ही थांबली 
वाट ही ओळखीची 
आज अनोळखी जाहली 
संपले तुझ्यासही
संपले स्वतःहूनी ।।१।।
रात्र ही काळोखली
प्रभा ही सरली 
भीती मानाची जिंकली 
प्रीत आपुली हारली 
संपले तुझ्यासही
संपले स्वतःहूनी ।।२।।
आठव जुनी राहिली 
पापणी पाणावली
संपले तुझ्यासही
संपले स्वतःहूनी ।।३।। #alone #love #lovepoem #marathi #quotes #love #sad #sadlove #marathiquotes #amruta
0d6383b7085bea6e7f22659ce71c4a59

Amruta

जो ना ईथे
तो मनी वसे
प्रेम मनीचे
डोळ्यात दिसे
का तुझ्यात 
प्रियकर भासे #love #sad #sadlove #marathiquotes #te #Amruta #marathi
0d6383b7085bea6e7f22659ce71c4a59

Amruta

भास

धुंद रात्र मोगऱ्याचा सुवास
तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास

तुझे मोकळे केस ती गालावरची बट तुझा मंद श्वास
 तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास

खोल आर्त डोळ नितळ कांती हृदयी माझाच ध्यास 
तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास

नाजूक पाऊल त्यावरचे पैंजण रूप तुझे खास 
तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास

भास तो भास सत्य आहे फक्त आभास
मन विचलित करते तूझ्या मिलनाची आस 

तु जवळ असल्याचा सतत होतो मला भास #alone #love #lovepoem #marathi #quotes #love #sad #sadlove #marathiquotes #te #Amruta
loader
Home
Explore
Events
Notification
Profile